14.3 C
New Delhi
Thursday, January 8, 2026
Homeआरोग्यआदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलकडून आदित्य बिर्ला स्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलकडून आदित्य बिर्ला स्पेशालिटी क्लिनिकचे उद्घाटन

पुणे, – आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला आजच्या काही अत्यंत महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या आदित्य बिर्ला स्पेशालिटी क्लिनिकच्या उद्घाटनाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, या हॉस्पिटलद्वारे मधुमेह आणि उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (पीसीओडी) वर केंद्रित समर्पित क्लिनिक सुरु करण्यात येत आहे.

आदित्य बिर्ला हेल्थ क्लिनिकद्वारे लक्ष्यित, तज्ञांच्या नेतृत्वाखालील सेवा पुरवून आरोग्य सेवेची गुणवत्ता वाढविण्याच्या रहॉस्पिटलच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करण्यात येत आहे. ही विशेष क्लिनिक्स, रुग्णांना सर्वात प्रभावी आणि वैयक्तिकृत सेवा प्राप्त होईल याची खात्री करण्यासाठी त्यांच्या अद्वितीय गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आली आहेत.

आज अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आलेले हे क्लिनिक, पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डरचे निदान, उपचार आणि व्यवस्थापनासाठी वचनबद्ध आहे, ज्याद्वारे महिलांचे आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक समग्र दृष्टीकोन प्रदान करण्यात आला आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब क्लिनिकः जीवनशैली व्यवस्थापन, औषधोपचार आणि सतत देखरेखीसह सर्वसमावेशक दृष्टिकोनातून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे व्यवस्थापन आणि त्यावर उपचार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते.स्ट्रोक क्लिनिक हे स्ट्रोक प्रतिबंध, उपचार आणि पुनर्वसनासाठी प्रगत काळजी प्रदान करण्यासाठी समर्पित, हे क्लिनिक नवीनतम तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या बहुशाखीय टीमने सुसज्ज आहे.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पमेश गुप्ता म्हणाले “आम्ही आदित्य बिर्ला हेल्थ क्लिनिक सुरु करताना आनंदी झालो आहोत, जे आमच्या विशेष, उच्च – गुणवत्तेच्या आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या अभियानाला बळकटी देते,”या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक क्लिनिक अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि आमच्या रूग्णांसाठी सर्वोत्तम परिणाम सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत अनुभवी तज्ञ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.”

आदित्य बिर्ला हेल्थ क्लिनिक हे पुण्यातील विशेष सेवेची अत्यंत महत्वाची बाब बनणार आहे आणि यातून समुदायाच्या वाढत्या आरोग्य सेवा गरजा पूर्ण करण्यासाठी रुग्णालयाचे समर्पण प्रतिबिंबित होते.आदित्य बिर्ला स्पेशालिटी क्लिनिक आणि त्याच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी ९८८११२००६ वर संपर्क साधा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
14.3 ° C
14.3 °
14.3 °
28 %
1.6kmh
0 %
Thu
14 °
Fri
21 °
Sat
22 °
Sun
21 °
Mon
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!