28.1 C
New Delhi
Tuesday, November 12, 2024
Homeआरोग्यजाणून घेऊया हृदयविकाराची लक्षणे आणि प्रतिबंध- डॉ. प्रसाद शाह

जाणून घेऊया हृदयविकाराची लक्षणे आणि प्रतिबंध- डॉ. प्रसाद शाह

जेव्हा हृदयाच्या एका भागामध्ये रक्त प्रवाह अचानक अवरोधित होतो, तेव्हा हृदयाच्या स्नायूचे नुकसान किंवा मृत्यू होतो.याला तीव्र मायोकार्डियल इन्फेक्शन (एएमआय) म्हणतात, यालाच सर्वसामान्यपणे हृदयविकाराचा झटका म्हटले जाते. हा अडथळा सामान्यतः कोरोनरी धमन्यांमध्ये साठा (प्लेक) तयार झाल्यामुळे होतो, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे हृदयाचे स्नायू ऑक्सिजनला वंचित होतात आणि हे त्वरित वैद्यकीय मदत मिळाली नाही तर हे जीवघेणे ठरू शकते. पुण्यातील पूना हॉस्पिटल सिनियर कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रसाद शाह यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, श्वास घेताना त्रास होणे (विश्रांती असतानाही),मळमळ, घाम येणे किंवा डोके हलके- हलके वाटणे ही हृदयविकाराची सामान्य लक्षणे आहेत.

डॉ शाह म्हणतात, हृदयाच्या दृष्टीने निरोगी जीवनशैली ही एएमआयचा प्रतिबंध करण्याची सुरुवात होय. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबीयुक्त संतुलित आहार घेणे हे लाभकारक ठरते, परंतु अधिकचे मीठ, साखर आणि अस्वास्थ्यकर चरबी मर्यादित करणे हेही आवश्यक असते. निवांत वेळेस चालणे किंवा सायकल चालवणे यांसारख्या नियमित व्यायामामुळे सामान्य वजन कायम राहण्यास, रक्तदाब कमी होण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत होते.

धुम्रपान हा धोक्याचा वाढीव घटक आहे, त्यामुळे हृदयविकाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. म्हणून ते बंद केले पाहिजे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

दीर्घकालीन तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग होऊ शकतो म्हणून तणाव चांगल्या प्रकारे हाताळला पाहिजे. कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असलेल्या किंवा उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यासारखी स्थिती असलेल्या व्यक्तींनी लवकर निदान आणि व्यवस्थापनासाठी वैद्यकीय डॉक्टरांकडे नियमित तपासणी करावी, असा सल्ला डॉक्टर देतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
51 %
2.1kmh
1 %
Tue
32 °
Wed
32 °
Thu
32 °
Fri
32 °
Sat
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!