34.5 C
New Delhi
Sunday, June 7, 2026
HomeTop Five Newsनागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून ठेवावा-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

पुणे, -: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने २० मे २०२६ रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरुन जाऊ नये व आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवत शांतता राखवी, असे आवाहन गि. दि. हुकरे अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त (औषधे) पुणे विभाग, यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. तसेच रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातर्फे विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत.

या बंदमुळे शहर व जिल्ह्यातील बहुतेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. तथापि, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहू शकतात. पुणे जिल्हयातील मेडप्लस, अपोलो फार्मसी, वेलनेस फॉरएव्हर तसेच रुग्णालय संलग्न औषध दुकाने व जेनेरिक औषध दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत.

औषध दुकानदारांना परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध होणे हा त्यामागील मुख्य उद्देश असून, बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे व आदेशांची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होवू नये, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासनाचे, सह आयुक्त श्री. गि. दि. हुकरे यांनी केले आहे.

रुग्णांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी रु. वि. पोंगळे, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 9730085588, श्रीमती स. कृ. तितर-दातीर, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 8605000460, आ. आ. रासकर, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 8652583525, सं. मा. राठोड, सहाय्यक आयुक्त (औषधे), पुणे जिल्हा, भ्रमण्ध्वनी 9923304650 या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.5 ° C
34.5 °
34.5 °
31 %
2kmh
0 %
Sun
41 °
Mon
44 °
Tue
45 °
Wed
46 °
Thu
45 °

Most Popular

Recent Comments