29.1 C
New Delhi
Tuesday, November 4, 2025
Homeक्रीड़ाआशियाई सिलंबम स्पर्धेतील विजेत्यांचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले स्वागत

आशियाई सिलंबम स्पर्धेतील विजेत्यांचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले स्वागत

महापालिकेत झाला कार्यक्रम, खेळाडूंसोबत विविध विषयावर झाली चर्चा

पिंपरी, : दोहा कतार येथे झालेल्या आशियाई सिलंबम स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या महाराष्ट्र संघातील खेळाडू व संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय बनसोडे यांचा पिंपरी चिंचवड महापालिका माहिती व जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी महापालिकेत सत्कार केला. तसेच खेळाडूंना स्पर्धेत आलेले अनुभव जाणून घेत त्यांना विविध विविध विषयांवर मार्गदर्शन केले.नुकत्याच दोहा कतार येथे झालेल्या आशियाई सिलंबम स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सिलंबम संघाने चमकदार कामगिरी करत १ सुवर्ण, ६ रौप्य आणि १ कांस्य पदक आपल्या नावावर केले. या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील मलेशिया, दुबई, भारत, श्रीलंका, सिंगापूर, बांगलादेश, कतार, साउद अरेबिया या देशातील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड येथील रहिवासी महाराष्ट्र सिलंबमचे मुख्य प्रशिक्षक संजय बनसोडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

यामध्ये भारतीय संघाकडून मुलांच्या गटात सूरज बांगर याने (१४ वर्षाखालील वयोगट) काठी फिरविणे या खेळ प्रकारामध्ये सुवर्णपदक आणि काठीची लढत मध्ये रौप्य पदक मिळविले. केतन नवले (खुला वयोगट) याने काठी फिरविणे या खेळ प्रकारात रौप्य पदक आणि काठीची लढतमध्ये कांस्य पदक मिळविले.

मुलींच्या गटात रिद्धीका पाटील हिने (१२ वर्षाखालील वयोगट) काठी फिरविणे या खेळ प्रकारात रौप्य पदक आणि काठीची लढतमध्ये रौप्य पदक मिळवले. श्रेया दंडे हिने (१८ वर्षाखालील वयोगट) काठी फिरविणे खेळ प्रकारात रौप्य पदक आणि काठीची लढतमध्ये रौप्य पदक मिळवले. असे एकूण महाराष्ट्र संघासाठी १ सुवर्ण, ६ रौप्य आणि १ कांस्य पदके मिळाली. या सर्व खेळाडूंसोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून पिंपरी चिंचवड येथील रहिवासी महाराष्ट्र सिलंबम स्पोर्ट्स अध्यक्ष संजय बनसोडे यांनी मोलाची कामगिरी बजावली. या सर्व खेळाडूंचा उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी सत्कार केला. तसेच त्यांच्याशी संवाद साधत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


मुख्य प्रशिक्षक बनसोडे यांच्या आई महापालिकेत नोकरीला

आशियाई सिलंबम या स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून मोलाची कामगिरी बजाविणारे संजय बनसोडे यांची आई संगीता बनसोडे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ विभागात गेल्या २२ वर्षापासून आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहेत. याबाबत संगीता बनसोडे यांनी सांगितले की,’मुलांना शिक्षणासोबतच खेळांची गोडी लावली. परदेशात जाऊन मुलाने देशाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल मला आई म्हणून समाधान वाटत आहे.’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
29.1 ° C
29.1 °
29.1 °
37 %
2.6kmh
0 %
Tue
29 °
Wed
32 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!