22.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeक्रीड़ाएसएफए फुटबॉल टूर्नामेंट’ मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल ३र्‍या स्थानावर

एसएफए फुटबॉल टूर्नामेंट’ मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल ३र्‍या स्थानावर

पुणे : एसएफए फुटबॉल टुर्नामेंटमध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या फुटबॉल football खेळाडूंनी विजयाने सुरुवात केली.   शिवछञपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या एकतर्फी सामन्यात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी लॉयोला हायस्कूलवर २-० च्या विजयासह तिसर्‍या स्थानासाठी सामना जिंकला. खेळाडू आरव चौधरी व श्रीजन वर्मा यांनी गोल केला. ध्रुवच्या खेळाडूंनी प्रेक्षकांना ही विजयाची भेट देऊन टाळ्यांचा कडकडाट केला. खेळाडूंचा जोश आणि चिकाटी पाहून ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.
सामन्यातील पहिल्या हाफ च्या २५’ व्या मिनिटाला ध्रुव ग्लोबल स्कूलचा खेळाडू आरव चौधरी याने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात ध्रुव स्कूलच्या खेळाडूंनी ही आघाडी कायम ठेवली. दुसर्‍या सत्रातही ध्रुव च्या खेळाडूंनी उत्कृृष्ट कामगिरी सुरू ठेवली. २९’ व्या मिनिटाला श्रीजन वर्मा याने गोल करत संघाची आघाडी २-० अशी वाढवली व विजय निश्चित केला.  
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या फुटबॉल टीम मध्ये समनमय गुप्ता, आरव चौधरी, कबीर बिजूर, आयुष गाडवे, अर्जुन विजयेंद्रन, नमिष सिंह, श्रीजन वर्मा आणि नरेन प्रसाद यांचा समावेश होता. या खेळाडूंनी आपल्या चिकाटीच्या जोरावर यश मिळविले. या खेळाडूना समर्पित प्रशिक्षक अमेय कलाटे आणि पार्थ सायकिया यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
22.1 ° C
22.1 °
22.1 °
68 %
0kmh
2 %
Sun
28 °
Mon
32 °
Tue
29 °
Wed
32 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!