नवी दिल्ली- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारीला दुबईत होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलसाठी यूएईची निवड केली होती.चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची सुरुवात १९ फेब्रुवारीला कराची येथे होणार असून अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार आहे. ८ संघांच्या या स्पर्धेत १५ सामने असतील आणि हे सामने पाकिस्तान आणि दुबईमध्ये खेळले जातील.
पाकिस्तानमध्ये रावळपिंडी, लाहोर आणि कराची या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक ठिकाणी ३ गट सामने होतील, इतर उपांत्य फेरीचे आयोजन लाहोरमध्ये होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २३ फेब्रुवारीला सामना होणार आहे.
जर भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचू शकला नाही तर अंतिम सामना ९ मार्च रोजी लाहोरमध्ये खेळवला जाईल. जर भारत फायनलमध्ये पोहोचला तर हा सामना दुबईत खेळवला जाईल. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे.
तीन गट सामने आणि भारताचा समावेश असलेला पहिला उपांत्य सामना दुबईत खेळवला जाईल.
स्पर्धेतील पहिला सामना (१९ फेब्रुवारी) अ गटातील पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध दुबईत होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ गट
अ गट – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
ब गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वेळापत्रक
१९ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
२० फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
२१ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
२२ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२३ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
२४ फेब्रुवारी, बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
२५ फेब्रुवारी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
२६ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
२७ फेब्रुवारी, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
२८ फेब्रुवारी, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
१ मार्च, दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
२ मार्च, न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
४ मार्च, उपांत्य फेरी १, दुबई
५ मार्च, उपांत्य फेरी २, लाहोर
९ मार्च, फायनल, लाहोर
१० मार्च, राखीव दिवस