23.1 C
New Delhi
Sunday, March 23, 2025
Homeक्रीड़ापिंपरी-चिंचवडमध्ये ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडतील!

पिंपरी-चिंचवडमध्ये ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडतील!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विश्वास

  • ‘स्पोर्ट्स सिटी’चा संकल्पातून क्रीडा क्षेत्राला चालना

पिंपरी -शहरातील स्थानिक खेळाडुंना कुस्ती, कबड्डी, धनुर्विद्या, नेमबाजी यासह रोविंग, स्केटिंग, बॉक्सिंग अशा नव्या युगातील खेळांमध्ये चमकदार कामगिरी करता येईल, अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहरात ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडतील, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.

आमदार महेश लांडगे यांनी ‘‘स्पोर्ट्स सिटी पिंपरी-चिंचवड’’ या संकल्पनेसंदर्भात पिंपरी-चिंचवडकरांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी गेल्या १० वर्षांत त्यांनी उभारलेले महत्त्वाकांक्षी क्रीडा प्रकल्प आणि विकासकामांचा लेखाजोखा मांडला.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक खेळाडुंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात. या करिता आम्ही ‘‘स्पोर्ट्स सिटी- पिंपरी-चिंचवड’’ असा संकल्प केला होता. २०१७ मध्ये सूज्ञ पिंपरी-चिंचवडकरांनी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमताने काम करण्याची संधी दिली. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने वाव मिळाला. तत्पूर्वी, स्थायी समितीचा सभापती म्हणून काम करताना महानगरपालिका प्रशासनाचे राज्यातील पहिले स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करुन आपण अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श निर्माण केला होता, ही बाब मला अभिमानाने नमूद करावी, असे वाटते.


देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य मिळाले…
आमदार लांडगे म्हणाले की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारच्या सहकार्याने व महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. कै. पै. मारुतीराव रावजी लांडगे यांच्या नावाने सुरू केलेल्या या संकुलामध्ये नामवंत पैलवान नरसिंग यादव यांच्या मार्गदर्शनाने सध्या ७० कुस्तीपटू सराव करीत आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्र, आंतरराष्ट्रीय स्केटिंग ग्राउंड, आंतरराष्ट्रीय रोविंग सेंटर, धनुर्विद्या (आर्चरी) प्रशिक्षण केंद्र, राष्ट्रीय रायफल व पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षण केंद्र, लॉन टेनिस कोर्ट, विविध व्यायामशाळा, विविध जलतरण तलावांचे काम गेल्या १० वर्षांध्ये पूर्ण केले. आपल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्रामध्ये जगविख्यात ‘‘प्रो-कबड्डी’’ स्पर्धेतील खेळाडूंनी सराव केला.


बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याचा लढा अविस्मरणीय…
माझ्या राजकीय जीवनातील ‘एक सोनेरी पान’ म्हणावे, असे कार्य माझ्या हातून घडले. भारतीय संस्कृती आणि शेतकऱ्यांचा अभिमान असलेली ‘‘बैलगाडा शर्यती’’वरील बंदी उठवण्यात आपण यशस्वी झालो. २०११ पासून यासाठी आपल्याला रस्त्यावरील आणि न्यायालयातील दोन्ही संघर्ष करावा लागला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे तयार केलेला ‘‘रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल्स’’ हा अहवाल निर्णायक ठरला. अखिल भारतीय बैलागाडा संघटना आणि शर्यतप्रेमींच्या सोबतीने हा लढा यशस्वी झाला. विशेष म्हणजे, शर्यतींवरील बंदी उठवल्यानंतर आपण देशातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत आपल्या शहरात घेतली. त्याला शेतकरी, शर्यतप्रेमींनी विक्रमी प्रतिसाद दिला. यासह, देशी गोवंश व अश्व प्रदर्शनही लक्षवेधी ठरले, याचे समाधान वाटते, अशा भावनाही आमदार महेश लांडगे यांनी यावेळी व्यक्त केल्या.


पिंपरी-चिंचवड शहराला ‘‘स्पोर्ट्स सिटी’’ घडवण्यासाठी विविध महत्त्वाकांक्षी क्रीडा प्रकल्प उभारले आहेत. आगामी काळात मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय स्टेडिअम, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र, क्रिकेट ॲकॅडमींना प्रोत्साहन देण्यासह पुण्यातील डेक्कन जिमखानाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड स्पोर्ट्स क्लब सुरू करण्याबाबत मी पाठपुरावा करीत आहे. आपल्या शहरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धासह ऑलिंपिक विजेते खेळाडू घडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. शहराला ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जावर ओळख निर्माण करुन देण्यासाठी आणि शहराच्या क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी जिद्दीने काम करीत आहे.

  • महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
53 %
1kmh
0 %
Sat
26 °
Sun
35 °
Mon
37 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!