8.1 C
New Delhi
Friday, January 16, 2026
Homeक्रीड़ामुंबई इंडियन्सच्या वाढल्या अडचणी

मुंबई इंडियन्सच्या वाढल्या अडचणी

प्लेऑफमध्ये पोहोचणे झाले अवघड

आयपीएलच्या सतराव्या हंगामाला मुंबई इंडियन्स संघाने नवा कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली. मात्र, पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण पहिल्या सलग ३ सामन्यात संघाचा पराभव झाला होता. या पराभवातून सावरत संघाने सलग दोन विजयांची नोंद केली. परंतु शेवटच्या दोन पराभवांमुळे त्यांचा प्लेऑफमधील मार्ग कठीण झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धबाजी मारून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला होता, पण शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या पराभवाने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायला आला होता. प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात २५७ धावा केल्या. सलामीला आलेल्या जेक फ्रेजरने अवघ्या २७ चेंडूत ६ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ८४ धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत ४८ धावांची नाबाद खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या संघाला कर्णधार हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माच्या अर्धशतकानंतरही केवळ २४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे १० धावांनी पराभव पत्कारावा लागला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
8.1 ° C
8.1 °
8.1 °
87 %
1kmh
2 %
Thu
13 °
Fri
22 °
Sat
24 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!