टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची INDIA VS ENG वनडे मालिका जिंकली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (९ फेब्रुवारी) कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि सर्वबाद ३०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ४४.३ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात ३०८ धावा करत सामना जिंकला.हा सामना हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकाही २-० अशी खिशात घातली आहे. याआधी भारतीय संघाने नागपूर वनडेतही केवळ ४ विकेट्सने विजय मिळवला होता. आता पुढचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी खेळला जाईल. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्माने ROHTI SHARMA९० चेंडूत ११९ धावांची तुफानी शतकी खेळी खेळली. त्याने एकूण ७ षटकार आणि १२ चौकार लगावले. त्याचा स्ट्राईक रेटही १३२.२२ होता.
रोहितने ७६ चेंडूत शतक झळकावले
रोहितचे वनडे कारकिर्दीतील हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले. त्याने ७६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. रोहितने १६ महिन्यांनंतर वनडेमध्ये शतक झळकावले आहे.यापूर्वी त्याने ११ ऑक्टोबर २०२३ रोजी एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर दिल्लीत झालेल्या एकदिवसीय सामन्यात रोहितने १३१ धावांची खेळी केली होती.