पुणे -: बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे झालेल्या वॉटर पोलो झोनल स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूल आणि डेक्कन जिमखाना यांच्यात रोमांचकारी सामना खेळण्यात आला. उत्तम खेळ खेळत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी कांस्यपदक मिळविले.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या वॉटर पोलोच्या टीम मध्ये इशान मंत्री, सोहम बारी, पारिजात चंद्र, जैत्रा सचिन भोर, आदर्श खोब्रागडे, पार्थ विनोद पोटे, सुमेध पानसे, मंदार कोल्हटकर, यश रेवतकर, विवान निलय काळे, शर्विल जंगम, आयुष शैलेश नाशी आणि अद्विक प्रसाद भालेकर यांचा समावेश होता.
वॉटर पोलो स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंची चिकाटी, खेळाप्रती असलेली आस्था आणि संघ भावना यांच्या जोरावर त्यांनी यश खेचून आणले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्रिन्सिपल संगीता राउतजी यांनी भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कपिलेश हरणे आणि अनिकेत सरदार यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.