17.1 C
New Delhi
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीड़ा३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ ची घोषणा केली आहे. नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अथलीट प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर झाली आहे.भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. मनु भाकर (Manu Bhakar) आणि डी गुकेशसह (D Gukesh)  ४ खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार दिला जाणार आहे तर ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मनु भाकर आणि डी गुकेश यांच्याशिवाय हॉकी खेळाडू हरमनप्रीत स‍िंग आणि पॅरा एथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांनाही खेल रत्न पुरस्कार द‍िला जाणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना १७ जानेवारी २०२५  (शुक्रवार) सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार वितरण केले जाणार आहे. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. मनु भाकर (Manu Bhakar) आणि डी गुकेशसह (D Gukesh)  ४ खेळाडूंना खेल रत्न पुरस्कार दिला जाणार आहे तर ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मनु भाकर आणि डी गुकेश यांच्याशिवाय हॉकी खेळाडू हरमनप्रीत स‍िंग आणि पॅरा एथलीट खेळाडू प्रवीण कुमार यांनाही खेल रत्न पुरस्कार द‍िला जाणार आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना १७ जानेवारी २०२५  (शुक्रवार) सकाळी ११ वाजता राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि मिश्र सांघिक प्रकारात ब्राँझपदक जिंकून २२ वर्षीय मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. तिने १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक आणि १०  मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकले.

याच ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीतने भारतीय पुरुष हॉकी संघाला सलग दुसरे ब्राँझपदक मिळवून दिले आणि भारतीय खेळातील आपला वारसा आणखी मजबूत केला. दरम्यान, १८ वर्षीय बुद्धिबळपटू गुकेशने सर्वात तरुण विश्वविजेता बनून चर्चेत आले. गेल्या वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणारा हा १८ वर्षीय खेळाडू सर्वात तरुण विश्वविजेता ठरला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
17.1 ° C
17.1 °
17.1 °
82 %
2.1kmh
20 %
Wed
19 °
Thu
22 °
Fri
22 °
Sat
22 °
Sun
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!