पुणे – ध्रुव ग्लोबल स्कूलची पॉवर हाऊस गिर्यारोहक जिजा माळवे ने हैदराबादमधील ओपन बोल्डरिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तिने गिर्यारोहण क्षेत्रात पराक्रम गाजवला आहे. ही अपूर्व कामगिरी करणारी जिजा ही अद्वितीय गिर्यारोहक ठरली आहे. जिजा ला बालपणापासून घरच्यांकडून गिर्यारोहणाचे धडे मिळाले. तिने घरच्यांबरोबर परिसरातील डोंगरकडे पालथे घातले. जिद्द व इच्छाशक्ती कायम ठेवत तिने शिखराला गवसणी घातली.
तीच्या या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्रिन्सिपल संगीता राऊतजी यांनी भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
हे यश मिळाल्यावर जिजा म्हणाली की, माझा आनंद द्विगुणित झाला आहे. मला पुन्हा आज नव्याने प्रेरणा मिळाली आहे. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
यापूर्वी जिजा ने अहमदाबादमधील वेस्ट झोन क्लाइंबिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. तसेच बंगळुरूमध्ये आयोजित राष्ट्रीय गिर्यारोहण चॅम्पियनशीप २०२४मध्ये आपले स्थान पक्के केले. जिजा ही गेल्या ३ वर्षापासून भारतीय संघात एक अजिंक्य शक्ती आहे. तीने वर्ष २०२२ व २०२३ मध्ये आशियाई गिर्यारोहण चॅम्पियनशिपमध्ये वर्चस्व गाजवले आहे. भविष्यात ती राष्ट्रीय स्पर्धेतही आपले नाव चमकवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
जिजा माळवे ला ओपन बोल्डरिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक
New Delhi
haze
27.1
°
C
27.1
°
27.1
°
47 %
1.5kmh
0 %
Tue
29
°
Wed
33
°
Thu
33
°
Fri
34
°
Sat
33
°