15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeक्रीड़ा"एमआयटी एडीटीच्या प्रा. केदारींची आंतरराष्ट्रीय जलक्रीडा मैदानावर तिहेरी कमाई!"

“एमआयटी एडीटीच्या प्रा. केदारींची आंतरराष्ट्रीय जलक्रीडा मैदानावर तिहेरी कमाई!”

पट्टाया (थायलंड)/पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या (एडीटी) ‘स्कूल ऑफ लॉ’चे प्रा. आदित्य केदारी यांनी थायलंडच्या पट्टाया येथे झालेल्या आशियाई इनडोअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी पदकांची तिहेरी कमाई करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्यांनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण, २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कलमध्ये रौप्य आणि ५०० मीटर मास्टर एकेरीमध्ये कांस्य पदक पटकावले.

    प्रा. केदारी हे सध्या पूर्णवेळ प्राध्यापक असूनही, त्यांनी जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना ही कामगिरी साधली आहे. त्यांच्या या यशामागे एमआयटी एडीटी बोट क्लबमधील कोच संदीप भापकर यांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सराव आहे. विशेष म्हणजे, प्रा. केदारी हे सलग दुसऱ्यांदा भारतीय संघात निवडले गेलेले महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू आहेत.

    या कामगिरीनंतर एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

    RELATED ARTICLES

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    New Delhi
    mist
    15.1 ° C
    15.1 °
    15.1 °
    82 %
    0kmh
    0 %
    Mon
    23 °
    Tue
    28 °
    Wed
    28 °
    Thu
    28 °
    Fri
    28 °

    Most Popular

    Recent Comments

    error: Content is protected !!