IPL2025-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेल्या निर्णयानुसार, आयपीएल २०२५ स्पर्धा १७ मे (शनिवार)पासून पुन्हा सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आता, ३ जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेचे उर्वरित सामने सहा सुरक्षित शहरांमध्ये आयोजित केले जातील. काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली असली, तरी बहुतेक खेळाडू पुन्हा संघात सहभागी होणार आहेत. बीसीसीआयने सर्व संबंधित पक्षांच्या सहमतीने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा हंगाम किमान पुढील आठवडाभर स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला होता. आता शनिवार, १७ मेपासून पुन्हा एकदा आयपीएलचा उर्वरित हंगाम सुरू होणार आहे. मंगळवार, ३ जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.
देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ स्पर्धा आता १७ मेपासून पुन्हा सुरू होणार असून ३ जूनला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजीत साइकिया यांनी दिली.

🇮🇳 युद्धजन्य पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
८ मे रोजी पंजाब-दिल्ली यांच्यात धरमशाला येथे सुरू असलेला सामना, पाकिस्तानकडून जम्मू-कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनहल्ले झाल्याने अर्धवट सोडावा लागला. स्टेडियममध्ये ब्लॅकआऊट झाल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आले. यानंतर ९ मे रोजी बीसीसीआयने संपूर्ण स्पर्धा आठवडाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
🗓️ नवीन वेळापत्रक – अंतिम सामना ३ जूनला
आता बीसीसीआयने पुन्हा नव्याने वेळापत्रक जाहीर केले असून, उर्वरित १६ सामने (१२ साखळी आणि ४ बाद फेरीचे) वेगवेगळ्या सुरक्षित शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना ३ जून रोजी अहमदाबादमध्ये होणार असल्याची माहिती आहे.