36.1 C
New Delhi
Wednesday, April 23, 2025
Homeक्रीड़ाआता आयपीएलचा थरार!

आता आयपीएलचा थरार!

आयपीएल २०२५ चा पहिला सामना गतविजेता केकेआर आणि आरसीबी संघात खेळला जाणार आहे. शनिवार २२ मार्चपासून शुभारंभ होणार आहे, तर अंतिम सामना २५ मे २०२५ रोजी खेळवला जाणार आहे. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. आयपीएलच्या इतिहासामध्ये रिषभ पंत यांच्यावर लखनौ सुपर जायंट्सने सर्वाधिक मोठी बोली लावून त्याला संघात घेतले. रिषभ पंत हा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार असणार आहे, त्याला २७ कोटींना फ्रॅन्चायझींनी विकत घेतले आहे. आयपीएल २०२५ चा पहिला सामना गतविजेता केकेआर आणि आरसीबी संघात खेळला जाणार आहे.

१८ व्या सीझनचा पहिला सामना ?

आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

१० आयपीएल संघांच्या कर्णधारांची नावे

कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – रजत पाटीदार
सनराझर्स हैदराबाद – पॅट कमिन्स
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
चेन्नई सुपर किंग्स -ऋतुराज गायकवाड
मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
लखनौ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
गुजरात जायंट्स – शुभमन गिल
पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर

कोणते आहे 10 संघ

कोलकाता नाईट रायडर्स –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नारायण, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, रमनदीप सिंग, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोर्किया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीत सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक

पंजाब किंग्स –

अर्शदीप सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, नेहल वधेरा, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, मार्को जानसेन, जोश इंग्लिस, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, हरनूर सिंग, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, आरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट, पायला अविनाश, प्रवीण दुबे

सनराझर्स हैदराबाद –

पॅट कमिन्स (कर्णधार), हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, अॅडम झम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन कार्से, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, इशान मलिंगा, सचिन बेबी

चेन्नई सुपर किंग्स –

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), मथिशा पाथिराणा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, आर. अश्विन, खलील अहमद, नूर अहमद, विजय शंकर, सॅम करन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुडा, गुर्जपनीत सिंग, नाथन एलिस, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, आणि यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी

दिल्ली कॅपिटल्स –

मिचेल स्टार्क, केएल राहुल, हॅरी ब्रूक (माघार घेतली – बदलीची घोषणा अद्याप बाकी आहे) , अक्षर पटेल, कुलदीप यादव, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, टी. नटराजन, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, फाफ डू प्लेसिस, मुकेश कुमार, दर्शन नालकांडे, विप्रज निगम, दुष्मंथा चामीरा, डोनोवन फरेरा, अजय मंडल, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी

लखनौ सुपर जायंट्स –

ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, मिचेल मार्श, मयंक यादव, निकोलस पूरन, आवेश खान, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, रवी बिश्नोई, दिग्वेश सिंग, आयुष बडोनी, मोहसिन खान, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शीन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीट्झके

मुंबई इंडियन्स –

हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, अश्विनी कुमार, मिशेल सँटनर, रीस टोपली, कृष्णन श्रीजित, राज अंगद बावा, सत्यनारायण राजू, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, लिजाद विल्यम्स, विघ्नेश पुथुर

गुजरात जायंट्स –

शुभमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, गेराल्ड कोएत्झी, अर्शद खान, गुरनूर ब्रार, शेरफेन रुदरफोर्ड, साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनत, कुलवंत खेजरोलिया

राजस्थान रॉयल्स –

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि संदीप शर्मा जोफ्रा आर्चर, महिष टिक्षना, वानिंदू हसरंगा, आकाश माधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, युद्धवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सूर्यवंशी, क्वेना मफाका, कुणाल राठोड, अशोक शर्मा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
36.1 ° C
36.1 °
36.1 °
4 %
4.2kmh
0 %
Wed
36 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!