पुणे,- नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थीनी इशान्वी बारपांडा हिला गोएथे इन्स्टिटूट पुणे यांच्याकडून जर्मनीतील सखोल भाषा अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. तीच्या या यशाबद्दल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी अभिनंदन करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
इशान्वीचे यश हे जर्मन भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. शिष्यवृत्तीचा एक भाग म्हणून तिने कोलोन येथील गोएथे इन्स्टिट्यूट मधून जर्मन भाषेचा बी२.१ या स्तराचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. या अभ्यासक्रमाच्या अखेरीस तिला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करून तिचा गौरव करण्यात आला.
नुकत्याच जर्मनीमध्ये पार पडलेल्या तीन आठवड्यांच्या कार्यशाळेत इशान्वीला अस्सल जर्मन भाषेचे वातावरण लाभले. त्यामुळे जर्मनी देशाची समृद्ध संस्कृती जवळून पाहण्याची व अनुभवण्याची अनमोल संधी मिळाली.
स्कूलच्या जर्मन शिक्षिका धनश्री महाजनी यांनी इशान्वीला मार्गदर्शन केले. इशान्वीची ही कामगिरी केवळ तिच्या भाषा शिकण्यातील निष्ठा, परिश्रम आणि जिद्द अधोरेखित करत नाही तर गोएथे इन्स्टिट्यूट द्वारे उपलब्ध होणार्या शैक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या सुवर्णसंधीचे महत्व रेखांकित करते.
ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थी इशान्वीला जर्मन शिष्यवृत्तीजर्मनीतील सखोल भाषा अभ्यासक्रमासाठी मिळाली शिष्यवृत्ती
New Delhi
haze
20.1
°
C
20.1
°
20.1
°
56 %
0kmh
0 %
Mon
25
°
Tue
28
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
28
°


