8.1 C
New Delhi
Friday, January 16, 2026
Homeक्रीड़ाआयएफएससी आशियाई स्पर्धेचे रंगारंग सोहळ्यात जल्लोषात उद्घाटन

आयएफएससी आशियाई स्पर्धेचे रंगारंग सोहळ्यात जल्लोषात उद्घाटन

१३ देशातील २०० खेळाडूंचा सहभाग

,
पिंपरी चिंचवड — पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच होत असलेल्या आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप २०२५चा भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत जल्लोषात, मोठ्या उत्साहात  पार पडला. देश-विदेशातील खेळाडू, मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात वातावरण उत्साहाने भारावून गेले. मान्यवरांच्या हस्ते बलून आकाशात सोडण्यात आले आणि त्या क्षणी संपूर्ण परिसरात जल्लोषाचा माहोल पसरला.

या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन (MSCA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. १ ते ४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान योगा पार्क, पिंपळे सौदागर येथील अत्याधुनिक क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स येथे ही स्पर्धा पार पडत आहे. यात १३ देशांतील सुमारे २०० युवा खेळाडू सहभागी झाले आहेत. उद्घाटन प्रसंगीआमदार शंकर जगताप, नानासाहेब काटे (भाजप, माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी चिंचवड मनपा), कर्नल विजय सिंग (IMF, Retd. VSM), किर्ती पायास (सचिव, IMF South Asia), विलास पाडळ (उपायुक्त महापालिका),डॉ. राधिका पाटील, विजय कुमार खोराटे ,  (अतिरिक्त आयुक्त, महापालिका ),सुरेंद्र शेळके,  किर्ती शेट्टी (Secretary General, IFSC Asia), राकेश इसिन (Secretary, IMF), श्रीकृष्ण कडुसकर आणि सागर पालकर (संकल्पक, क्लाइंबिंग सेंटर)

उद्घाटन सोहळ्यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “महाराष्ट्रात प्रथमच आयएफएससी आशियाई क्लाइंबिंग चॅम्पियनशिप आयोजित होत आहे, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्र आणि भारतातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळेल. भविष्यातही पालिका अशा स्पर्धांना संपूर्ण पाठबळ देईल.”

सांस्कृतिक सादरीकरण आणि पारंपरिक स्वागत
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक स्वागतगीत “We will rock you” वर जोशपूर्ण नृत्याने झाली. त्यानंतर सादर झालेल्या कथक नृत्याने समारंभाला संस्कृतीचा ठसा दिला. ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला, तर पंजाबी वाद्यांच्या जोशपूर्ण तालावर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नृत्याचा आनंद घेतला. विविध रंगी वेशभूषेत सजलेले कलाकार आणि नृत्यसमूह यांनी उद्घाटन सोहळ्याला कलात्मक आणि भव्य स्वरूप दिले.

इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशनचे सचिव किर्ती पायास म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले चढाईचा वारसा महाराष्ट्राने जगाला दिला. आज तोच वारसा आधुनिक क्लाइंबिंगच्या माध्यमातून आपण सादर करत आहोत. ही स्पर्धा केवळ खेळ नाही, तर आपल्या इतिहास आणि परंपरेचा सन्मान आहे.”

कर्नल विजय सिंग यांनी सांगितले की, “भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची क्लाइंबिंग स्पर्धा होणं हे मोठं यश आहे. या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना ऑलिंपिक दर्जाच्या प्रशिक्षणाचा अनुभव मिळेल.”

महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र शेळके म्हणाले, “पिंपरी चिंचवडमध्ये उभारलेला क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हा देशातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. या केंद्रामुळे महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होतील.”

योगा पार्क, पिंपळे सौदागर येथील क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स स्मार्ट सिटी मिशनच्या मदतीने उभारला गेला आहे. येथे अत्याधुनिक रूट्स, सुरक्षा प्रणाली, आणि प्रशिक्षणासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आयोजकांच्या मते, हा प्रकल्प “मिशन ऑलिंपिक २०३६” साठी महत्त्वाची पायरी ठरेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
8.1 ° C
8.1 °
8.1 °
87 %
1kmh
2 %
Thu
13 °
Fri
22 °
Sat
24 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!