15.1 C
New Delhi
Monday, November 10, 2025
Homeक्रीड़ासहकार करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५ चे उद्घाटन

सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५ चे उद्घाटन



पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजन ; एकूण १५ बँकांचा सहभाग

पुणे : पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतर सहकारी बँक ‘सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा २०२५’ चे उद्घाटन राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या हस्ते झाले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (२०२५) निमित्ताने आयोजित स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पंडित नेहरू स्टेडियम येथे पार पडला.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव अॅ’ड. सुभाष मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, संचालक प्रल्हाद कोकरे, राजेश कवडे, सय्यद मोहम्मद गौस शेर अहमद, संजय शेवाळे, कांतीलाल गुजर, बाबुराव शितोळे, प्रिया महिंद्रे, नंदा लोणकर, युवराज वारघडे आणि इतर बँकेचे वंदना काळभोर, कमल व्यवहारे, गौतम कोतवाल, अनिरुद्ध देसाई, दीपक घाडगे, अजय रजपूत, जितेंद्र पायगुडे आदी उपस्थित होते.

दीपक तावरे म्हणाले, आपण बँकेच्या माध्यमातून सहकार जपत असतो. मात्र, आज खेळाच्या मैदानावर देखील सर्व नागरी सहकारी बँका एकत्र येत सहकार बघायला मिळत आहे. आंतरबँक क्रिकेट स्पर्धा ही उत्तम संकल्पना असून खेळामुळे एकत्र येण्याचा आनंद सर्वानी घ्यावा.

निलेश ढमढेरे म्हणाले, बँकिंग क्षेत्र हा अर्थविषयक कणा आहे. यंदा स्पर्धेत १५ बँकांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. बँकांकडून क्रिकेट स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. दि.९ नोव्हेंबर पर्यंत दररोज ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील सामने स्वारगेट येथील पंडित नेहरू क्रिकेट स्टेडियम आणि सहकारनगरमधील शिंदे हायस्कूल मैदानावर होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने १० षटकांचे होणार आहेत. तर सहकारी बँक सहकार करंडक महिला बॉक्स क्रिकेट स्पर्धा देखील होणार आहे. यामध्ये ६ षटकांचे सामने होतील, असेही त्यांनी सांगितले. सिमा घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश वाणी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Mon
23 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!