पुणे, : पुणे येथील सुहास घोडके आणि कुर्डूवाडी चा प्रमोद सुळ यांच्यातील चुरशीच्या लढतीत सुहास घोडके यांने ५-० अंकाने महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. सव्वा लाख रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रुई) येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १८ वर्षापासून भरविण्यात येत आहेत.
प्रमोद सुळ यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये १ लाखाचे पारितोषिक देण्यात आले. जामखेड येथील सागर मोहोळकर याला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५० हजार रोख व कांस्य पदक देण्यात आले. चतुर्थ क्रमांकावर सोलापूर येथील कालीचरण सोलणकर याला २५ हजार रूपये रोख व पदक देण्यात आले. या स्पर्धेत एकूण २०० पेक्षा अधिक मल्लांनी भाग घेतला होता.
हिंद केसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा.कराड, श्री. काशीराम दा. कराड, आमदार श्री. रमेशअप्पा कराड, श्री राजेश कराड, श्री.ऋषिकेश कराड, प्रा. विलास कथुरे यांच्या हस्ते विजेत्यां मल्लांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी वस्ताद पै. निखिल वणवे उपस्थित होते. ७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. या पैकी तात्या शेषराव नलावडे हे विजेते ठरले तर विष्णू हे उपविजेते ठरले. या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्य सेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा स्मृती सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” रामेश्वरच्या मातीतून आज ना उदया राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू निर्माण होतील. भारताच्या कस्तीक्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या क्रीडा प्रकारात आपले मन आणि मनगट मजबूत होते. आजच्या तरुणांनी कुस्ती कडे वळणे गरजचे आहे.”
या वेळी जालना येथील मंठा गावातील पैलवान वैष्णवी रामकिसण सोळंके हिने १५ मिनीटात अद्वितीय योगासनाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. बाबा निम्हण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

वजन गटातील विजेते पुढीलप्रमाणे
(प्रथम क्रमांक – सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक व रोख रक्कम पुढे दिल्या प्रमाणे)
वजन गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक
८६ किलो (कौतुक डाफळे- कोल्हापूर), (सोनबा लवटे, पुणे), (फिरोज शेख-पुणे), (अर्जून काळे-सोलापूर)
रक्कम रु. ५०,०००/- रु. ४०,०००/- रु. ३०,०००/- रु.२०,०००/-
७४ किलो (आदर्श पाटील-कोल्हापूर) (विष्णू तातपूरे- लातूर), (शुभम सावंत- लातूर ), (विकी कारे- पुणे)
रक्कम रु.३०,०००/- रु.२०,०००/- रु.१५,०००/- रु.१०,०००/-
७० किलो (विपुल थोरात-पुणे), (भालचंद्र कुंभार-पुणे), (रविराज निंबाळकर- पुणे), (सोमनाथ गोरड- पुणे)
रक्कम रु.२०,०००/- रु.१५,०००/- रु.१०,०००/- रु.८,०००/-
६५ किलो (बाळासाहेब चौरे- बीड), (सार्थक शिंदे-धाराशिव), ( किरण सत्रे – पुणे ) (सौरभ कडवकर-धाराशिव ),
रक्कम रु.१५,०००/- रु.१०,०००/- रु.८,०००/- रु.५,०००/-
६१ किलो (अविनाश माने-खुडूस), (चिंतामणी भंडारे-सोलापूर), (अनिकेत पाटील-कोल्हापूर), ( निनाद बडदे- सांगली)
रक्कम रु.१०,०००/- रु.७,०००/- रु.५,०००/- रु.३,०००/-
५७ किलो ( विशाल सुरवसे-खुडूस , ( स्वप्निल जाधव – रामेश्वर), (आकाश गुट्टे- रामेश्वर), (मनोहर मुंडे- खुडूस),
रक्कम रु.१०,०००/- रु.७,०००/- रु.५,०००/- रु.३,०००/-
