अत्तर म्हणजे सुगंध..पण अत्तराचा सुगंध प्रत्येकाला मानवेलच असं नाही. उग्र वासामुळे काही जणांचं डोकं दुखतं. पण सौम्य सुगंधामुळे मन प्रसन्न होतं. अत्तराचा वापर धार्मिक विधीमध्ये सुद्धा केला जातो. अत्तराला ऐतिहासिक, सांस्कृतिक, व्यापाऱ्याची किनार आहे. या अत्तरासाठी उत्तर प्रदेशातील कन्नौज ओळखलं जातं. गंगा आणि काली या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या कन्नौजला उत्तर निर्मितीचा फार मोठा इतिहास आहे. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? अत्तराचा शोध नेमका कधी लागला असेल? कधीपासून अत्तराचा वापर सुरु झाला? चला तर या अत्तराच्या उगमाची कहाणी जाणून घेऊयात…
इसवी सन ६०६ ते ६४७ या काळात उत्तर भारतावर राज्य असलेल्या राजा हर्षवर्धन यांनी अत्तराच्या उद्योगाला राजाश्रय दिला. त्यानंतर हा अत्तराचा सुगंद मुघलांच्या काळात आणखी बहरला. अत्तर तयार करण्यासाठी फुलं, वनौषधी, फळं, लाकूड, मुळं, राळ आणि गवत यांचा वापर केला जातो. सुगंधासाठी थोड्या अधिक प्रमाणात या वस्तूंचं मिश्रण केलं जातं. कनौजमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने अत्तराची निर्मिती केली जाते. कोणत्याही यंत्राच्या यासाठी वापर केला जात नाही. एका मोठ्या रांजणीत यांचं मिश्रण करून विशिष्ट तापमानावर गरम केली जाते. त्यानंतर वाफ चढली की एका हवाबंद नळीतून थेंब थेंब करून अत्तर बाटलीत उतरतं. या प्रक्रियेसाठी खूप वेळ जातो. पण प्रत्येक थेंबात सुगंध तेही तितकंच खरं..
चॉकलेट मस्क, अल-रिहाब, सिल्व्हर, अल-रिहाब, सिबाया, स्विस अरेबियन जेनेट, अल नुआम, अल फिरदौस ग्रीन, ?रोकेम, अल-हरमन मदिना, अल-हरमन हजर, रासासी सोनिया हे देशातील सर्वोत्तम अत्तर ब्रँड आहेत.