लोणी काळभोर, पुणे- “हाती घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की” अशा हजारों विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या घोषणा, कृष्ण-राधेचे सुंदर रुप घेतलेली विद्यार्थ्यांची जोडी, बहारदार नृत्यांचा अविष्कार अशा उत्साहवर्धक वातावरणात एमआयटी एडीटी विद्यापीठात यंदाचा कृष्णजन्माष्टमी व दहीहंडी उत्सव पार पडला.
एमआयटी स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या(मिटकॉम) विद्यार्थ्यांकडून चोख नियोजन करण्यात आलेल्या या उत्सवाची सुरवात विश्वरुप देवता मंदीरामध्ये बाळ श्रीकृष्णाची आरती करून कण्यात आली. या उत्सवासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डॉ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, डॉ.अतुल पाटील, डॉ. सुराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.
एमआयटी एडीटी’ विद्यापीठात दहीहंडीचा जल्लोष
New Delhi
smoke
17.1
°
C
17.1
°
17.1
°
72 %
1.5kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
27
°
Thu
26
°
Fri
26
°