आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची चर्चा आजही कायम आहे. आचार्य चाणक्य हे महान तत्त्वज्ञ, रणनितीकार होते. त्यानी लिहिलेल्या नीतिशास्त्रात स्त्री आणि पुरुषांबद्दल बरेच तपशील सांगितले आहेत. त्यांनी केलेली भाकीतं आजही लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत उत्सुकता कायम आहे. नीतिशास्त्रात पुरूषांबद्दल काही महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आला आहे. महिला अनेकदा पुरुषांची काही गुपितं जाणून घेण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना त्यात यश येत नाही. जाणून घेऊयात आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात याबाबत काय लिहिलं आहे.
जुने नातं- स्त्री-पुरुष वैवाहिक संबंधात येतात तेव्हा त्यांचे नाते आयुष्यभराचे असते. या नात्यात खोटेपणाला थारा नसतो. महिला लग्नानंतर कायम आपल्या नवऱ्याला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांच्याबाबत सर्वकाही जाणून घेण्याची महिलांची इच्छा असते. त्यापैकी एक म्हणजे जुन्या नातेसंबंधांबाबत त्यांना जाणून घ्यायचं आहे. पण पुरुष त्यांच्या जोडीदारापासून त्यांचे जुने नाते लपवतात.पुरुषांचे चरित्र- पुरुषाचे चारित्र्य जोडीदाराला कळणं खूपच कठीण असतं. एखाद्या पुरुषाचे बारकाईने निरीक्षण केल्यावर त्याच्या चारित्र्याबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात. परंतु चारित्र्य मोजण्याचे प्रमाण प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. त्यामुळे पुरुषाचं चरित्र जाणून घेणं खरंच कठीण होऊन बसतं.
प्रेमाचा खोटा देखावा- पुरुषाच्या वैवाहिक जीवनाबद्दल जाणून घेणे सोपे नाही. एखाद्या पुरुषाच्या वैवाहिक जीवनात काही अडचण आली तरी त्याचे वागणे पाहून त्यांच्या नात्यात काय चालले आहे हे कोणीच सांगू शकत नाही? नातं वाचवण्यासाठी कधी-कधी पुरुषही प्रेमाचं खोटं नाटक करतात.
पुरुषांची ही गुपिते स्त्रियांना कळतच नाहीत
, जाणून घ्या काय सांगते चाणक्य निती
New Delhi
haze
23.1
°
C
23.1
°
23.1
°
60 %
1.5kmh
75 %
Mon
24
°
Tue
29
°
Wed
32
°
Thu
29
°
Fri
32
°


