17.2 C
New Delhi
Tuesday, February 11, 2025
Homeज़रा हट केमाईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन

माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू व एडीटीतर्फे ‘वंदन भारतमातेला’ आयोजन

७०० गायक-वादकांच्या स्वरलहरिने संध्याकाळ गुलजार

स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन

पुणे, : पखवाजचा ताल, तबल्यावरील थाप, व्हायोलियनचा व गायकांचा सुर आणि भारत मातेला वंदन या नृत्याने उपस्थित हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले. तसेच  ७०० हून अधिक गायक-वादकांच्या स्वरलहरिने सादर करण्यात आलेल्या ‘वंदन भारतमातेला’ या संगीत मानवंदनेमुळे संध्याकाळ गुलजार झाली. mit
 देशात प्रथमच माईर्स् एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमात ७०० हून अधिक गायक-वादकांना एकत्रित आणून त्यांचे सादरीकरण विश्वराजबाग लोणी काळभोर केले. “संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणार्‍या या कार्यक्रमाने उपस्थितांना आध्यात्मिक अनुभूती मिळाली. स्व. राज कपूर raj kapoor यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर lata mangeshakar यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन देणारा हा कार्यक्रम होता.


कार्यक्रमाची सुरूवात भारतीय संगीताचा अध्वर्यू मानल्या गेलेल्या पखवाज या प्राचीन वाद्यापासून झाली. पं. उद्धवबापू आपेगावकर यांनी शिव, गणपती पूजा आणि तांडव नृत्यला दिल्या जाणार्‍या तालाने पखवाज वाद्याने सुरूवात केली. जवळपास शेकडो वादकांनी एक सूर एक ताल ने उपस्थित प्रेक्षकांची दाद घेतली.
प्रसिद्ध तबला वादक गणेश तानवडे यांच्या मार्गदर्शनातील टीम ने तबल्यावरील थापेने संपूर्ण श्रोत्यांना आपल्या बोटांवर नाचविले. उत्कृष्ट वादनामुळे श्रोते स्वतःचे भान हरवून बसले होते. हा परफॉर्स स्व.पं. झाकीर हुसेन यांना समर्पित करण्यात आला. व्हायोलियन वादक तेजस उपाध्ये यांनी आपल्या वादनाने जशी काय श्रोतांच्या मनाची तारच छेडल्याची अनुभूती झाली.
यावेळी उपस्थित शेकडो गायकांनी राजकपूर यांच्या स्मृतिला आठवण करून सजन रे झूठ मत बोलो, मेरा जूता है जापानी, जिस देश में गंगा बहती या सारख्या गीतांचे सादरीकरण केले. यावेळी मेरा जूता है जापानी या गीतावर कलाकाराने सादरीकरण केले.येथील विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् या गितावर भारत मातेला समर्पित नृत्याचे सादरीकरण केले. सरते शेवटी ऐ मेरे वतन के लोगो हे गीत उपस्थित ७०० पेक्षा अधिक गायक वादकांनी सादर केलेल्या गीतामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रु टिपल्या गेले.एमआयटी संस्थेची श्रद्धा व आस्था असलेल्या वारकरी संप्रदायाच्या काही भजन व सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “संगीत साधनेतून ईश्वरदर्शन आणि शांतरसाची अनुभूती’ देणारा हा कार्यक्रम भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे प्रतिक आहे. भारतमातेला वंदन अभिवादन कार्यक्रमामुळे आंतरिक समाधान लाभले. आज ईश्वरअनुभूती झाली आहे.


यावेळी या प्रसंगी योगी अमरनाथ, प्रसिद्ध उद्योजक फिरोज व लिला पुनावाला, डॉ. गोयल, डॉ. बत्रा, विनोद शहा यांच्या बरोबरच शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, उद्योग, आर्थीक क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, हभप तुळशीराम कराड, काशीराम कराड, डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. स्वाती कराड-चाटे, ज्योती कराड-ढाकणे, पुनम नागरगोजे यांच्या सहित संपूर्ण कराड  परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याच प्रमाणे एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, आदिनाथ मंगेशकर  उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मिलिंद पांडे, डॉ.मिलिंद पात्रे व डॉ. शालिनी टोणपे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
17.2 ° C
17.2 °
17.2 °
24 %
1.2kmh
19 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
28 °
Sat
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!