17.2 C
New Delhi
Tuesday, February 11, 2025
Homeज़रा हट केस्त्री म्हणून संसाराचा हक्क या विवाहाने दिला

स्त्री म्हणून संसाराचा हक्क या विवाहाने दिला

नारी द वूमन या संस्थे द्वारा तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा

पिंपरी-मी मुलगा म्हणून जन्माला आले परंतु एक स्त्री म्हणून मला जगायचे होते. मला माझा संसार थाटायचा होता. आज या विवाह सोहळ्यामुळे मी एक स्त्री म्हणून माझा संसाराचा हक्क प्राप्त केला आहे. माझे स्वप्न आज साकार झाले असल्याचे मत तृतीयपंथीय वधू शिवान्या शिंदे हिने तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा प्रसंगी व्यक्त केले.
नारी द वुमन या संस्थेच्या माध्यमातून काळेवाडी येथील बालाजी लॉन्स येथे मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी तृतीयपंथीय पाच जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, प्रसाद शेट्टी, प्रमोद ताम्हणकर, उद्योजक मल्लीशेठ कद्रापूरकर, हरीश नखाते, गणेश आहेर, गुरुदास भोंडवे, रोहिणी रासकर, रेखा मोरे, सुजाता नखाते, ज्योती निंबाळकर, आशा भोसले, दीपक रोकडे, संतोष माळी, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा नारी द वुमन संस्थेचे कार्याध्यक्ष भाई विशाल जाधव, नारी द वुमन संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, पवना समाचार चे संपादक नाना कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, बापूसाहेब गोरे, दादाराव आढाव, शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, सामाजिक कार्यकर्ते अलकेश त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव गणेश मोकाशी आदी प्रमुख उपस्थित होते.
या सामुदायिक विवाह सोहळ्यात अमन गुप्ता व शिवान्या शिंदे,
गौरव लोंढे व अदनान मणियार,
माधुरी वैरागे व संतोष चव्हाण,
रोहिणी तायडे व धीरज सोनवणे,
आकाश कसबे व उमेश खान या पाच दांपत्यांचा विवाह संपन्न झाला.
सकाळी 11 वाजता साखरपुडा समारंभ पार पडला तर दुपारी तीन वाजता हळदी समारंभ पार पडला सायंकाळी सात वाजता या दांपत्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह समारंभ पार पडला.
या विवाह संदर्भात बोलताना प्रसिद्ध उद्योजक संतोष भाऊ बारणे म्हणाले की, “शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवड शहराने अनेक क्रांतिकारी पाऊल उचलून सामाजिक उत्कर्षाचा पदपथ निर्माण केला आहे. हे शहर बेस्ट सिटी म्हणून ओळखले जाते. आशिया खंडातील वास्तव्यास सर्वोत्कृष्ट शहर म्हणून या शहराची ओळख आहे. आज संपन्न झालेल्या या तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे समाजातील तृतीयपंथीय वर्गाला सामाजिक न्याय प्रदान करण्याचा धाडसी प्रयत्न झाला आहे.”
या नववधूंना मंगळसूत्र प्रदान केलेले सामाजिक कार्यकर्ते अल्केश त्रिपाठी म्हणाले की तृतीय पंथीय व्यक्तीला एक आगळा सन्मान या विवाहमुळे प्राप्त झाला आहे.
नगरसेविका सुप्रिया चांदगुडे यावेळी म्हणाल्या की नाना कांबळे अर्चना मेंगडे विशाल जाधव यांनी या विवाहाच्या निमित्ताने सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आहे.
उद्योजक मल्लिशात कदरापूरकर या विवाह संदर्भात म्हणाले की हा विवाह सोहळा क्रांतिकारी पाऊल असून दरवर्षी अशा विवाहासाठी आपण मंगल कार्यालय मोफत उपलब्ध करून देणार आहोत.
आमदार शंकर भाऊ जगताप यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की हा विवाह सोहळा पिंपरी चिंचवड चा इतिहासात नोंद होईल असा असून पिंपरी चिंचवड शहराने संपूर्ण देशापुढे आपला नवा आदर्श निर्माण करून दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
17.2 ° C
17.2 °
17.2 °
24 %
1.2kmh
19 %
Tue
29 °
Wed
28 °
Thu
27 °
Fri
28 °
Sat
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!