42.9 C
New Delhi
Sunday, June 15, 2025
Homeताज्या बातम्याअरविंद सावंत, सुधीर मुनगंटीवार यांना यंदाचा आदर्श खासदार, आमदार पुरस्कार 

अरविंद सावंत, सुधीर मुनगंटीवार यांना यंदाचा आदर्श खासदार, आमदार पुरस्कार 

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे आठवी युवा संसद

माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, नऱ्हे तर्फे आठव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३० व ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत संस्थेच्या सभागृहात होणाऱ्या संसदेत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श खासदार व आमदार पुरस्काराने गौरविण्यात येणार  आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष व संसदेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवार, दि. ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन सत्रामध्ये या दोन पुरस्कारांसह समाधान आवताडे यांनी आदर्श आमदार, विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आदर्श नगरसेवक, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच आणि अ‍ॅड. मंगेश ससाणे यांना आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमित गोरखे amit ghorakhe, आमदार सत्यजित देशमुख, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ग्रामसभा ते लोकसभा याविषयावर मान्यवर आपले विचार मांडतील. यावेळी संस्थेच्या ८ व्या उडान चे प्रकाशन देखील होणार आहे.

गुरुवारी दुसऱ्या सत्रात दुपारी ३ वाजता राजकारणातील व समाजकारणातील महिलांचा सहभाग याविषयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री यशोमती ठाकूर, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई, अहिल्या फाऊंडेशन अध्यक्ष रमाबाई लटपटे या मार्गदर्शन करणार असून पूजा पारगे यांना आदर्श जिल्हा परिषद सदस्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शुक्रवार, दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता तिसऱ्या सत्रात वर्षा मोळवणे यांना आदर्श नगरसेवक आणि ओंकार गुंडगे यांना आदर्श युवा पुरस्काराने गौरविण्यात येईल. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार, मंदार फणसे उपस्थित राहणार आहेत. माध्यमे राजकारण घडवतात? याविषयावर मान्यवर संवाद साधणार आहेत. तर, दुपारी १२ वाजता राजेंद्र शिळीमकर यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यावेळी माजी आमदार कपिल पाटील, पत्रकार प्रसन्न जोशी, निलेश खरे आदी मान्यवर उपस्थित राहून व्हिजन भारत २०२९ यावर आपले विचार व्यक्त करतील.

संसदेच्या समारोपप्रसंगी दुपारी ३ वाजता विजय शिवतारे, महेश लांडगे, कैलास पाटील यांना आदर्श आमदार, सत्यजित तांबे यांना युवा आदर्श आमदार, सुशील मेंगडे यांना आदर्श नगरसेवक, गजानन काळे व अजिंक्य सगरे यांना आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी आमदार हेमंत पाटील, राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी आमदार संग्राम थोपटे, आमदार उत्तमराव जानकर आदी मान्यवर सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत यावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर लिखित मानवी कल्याणाचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, गणराज्य संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा अंधारे, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, भारतीय छात्र संसदेचे अध्यक्ष राहुल कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर हे संसदेच्या कार्यकारिणीमध्ये आहेत.

* संसद कट्टा अंतर्गत अजित पवार व छगन भुजबळ यांची मुलाखत
शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दुसऱ्या संसद कट्टा अंतर्गत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे आणि तृतीय संसद कट्टा अंतर्गत दुपारी १ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुलाखतीचे सत्र होणार आहे. संसदेत मागील वर्षी पहिल्या संसद कट्टा अंतर्गत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची मुलाखत झाली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.9 ° C
42.9 °
42.9 °
36 %
0.7kmh
0 %
Sun
45 °
Mon
43 °
Tue
43 °
Wed
45 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!