30.1 C
New Delhi
Saturday, May 10, 2025
Homeताज्या बातम्याअलार्ड विद्यापीठात फ्रेशर्स पार्टी आगाज-२०२४ चे आयोजन

अलार्ड विद्यापीठात फ्रेशर्स पार्टी आगाज-२०२४ चे आयोजन

पुणे: “नव्याने प्रवेश घेतलेले विदयार्थी हे विद्यापीठाचे रोपटे असतात आणि त्यांचे संगोपन केल्यानंतर ते संस्थेला आणि समाजाल एका विशाल वृक्षाप्रमाणे सावली देतात.” असे मत अलार्ड विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. पूनम कश्यप यांनी व्यक्त केले.अलार्ड युनिव्हर्सिईच्या स्कूल ऑफ हेल्थ अँड अलाईड सायन्सेस, स्कूल ऑफ लॉ आणि स्कूल ऑफ डिझाईन यांनी त्यांच्या पहिल्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी आगाज-२०२४ चे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना ते संबोधित करीत होते.अलार्ड विद्यापीठाचे कुलपती डॉ. एल.आर.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ. पूनम कश्यप म्हणाल्या, “फ्रेशर्स डे कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची एकमेकांशी ओळख करून दिली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्यात त्यांच्या निवडलेल्या विद्यापीठातून करिअर सुरू करण्याचा आणि नवीन उंचीवर नेण्याचा उत्साह ही निर्माण होतो.”  अलार्ड चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेचे सचिव डॉ. राम यादव म्हणाले, “आता तुमच्याकडे विद्यापीठाच्या रूपात एक खुला कॅनव्हास आहे. जिथे तुम्ही तुमची स्वप्ने विविध रंगांनी भरून सुंदर बनवू शकता. तसेच, आपण भारत देश आणि जगाला अधिक सुंदर बनवू शकतो.”स्कूल ऑफ हेल्थ अ‍ॅड बायोसायन्सचे डीन डॉ. प्रा. अजय कुमार जैन म्हणाले,” तुम्ही जे काही कराल त्यात चांगले करा. आता शिकत असताना कमवण्याची वेळ आली आहे. यासाठी विद्यापीठात विविध प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तुम्ही या विद्यापीठाची संपत्ती झाला आहात. आम्ही आमची सर्व शक्ती तुम्हाल अधिक मौल्यवान बनवण्यासाठी लावू. येथील प्रगत सुविधा आणि दर्जेदार शिक्षकांच्या मदतीने तुम्ही संपूर्ण राष्ट्रासाठी एक महत्वाचे मानव संसाधन असल्याचे सिद्ध व्हाल.”या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रॅम्प वॉक, कविता, गाणी, खेळ, प्रात्यक्षिके आणि नृत्यातून आपली प्रतिभा आणि कौशल्य दाखवले. कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्य आणि जीवशास्त्रातील कशिश आणि अमृत श्रीवास्तव, स्कूल ऑफ डिझाइनमधील प्रकृती आणि ओम यांना मिस्टर फ्रेशर आणि मिस फ्रेशर ही पदवी देण्यात आली.
यावेळी एपीएस संचालिका ज्योत्स्ना मिश्रा आणि मुख्याध्यापिका शुभ्रा श्रीवास्तव यांना ज्युरी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात मॅनेजमेंट सायन्सचे डीन प्रा. डॉ.डी.के. त्रिपाठी, स्कूल ऑफ डिझाइनचे डीन डॉ. प्रा.अमित आणि प्रा. एस.के. श्रीवास्तव उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  व्यवस्थापन डॉ. सविता पांडे, डॉ. दिशा पटेल, आशिष, सोनाली व इतर प्राध्यापकांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
54 %
1.5kmh
20 %
Fri
32 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
43 °
Tue
43 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!