श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून दरवर्षी करोडो भाविक येतात . त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी ,शुद्ध व थंड पिण्याचे पाणी बाराही महिने भाविकांना कायम मिळावे यासाठी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा “प्याऊ -जल प्रकल्प ” लोकार्पण करतांना मला अतिशय आनंद होत आहे , या निमित्ताने रुपये २६. ५० लक्ष निधीचा ,२००० लिटर क्षमतेचा आर ओ प्लांट उभारण्यात आला आहे व मंदिराच्या चारही मजल्यावर सर्वच ठिकाणी थंड व शुद्ध पाणी भाविकांना उपलब्ध होणार आहे आणि रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आई भवानी मातेच्या चरणी हा प्रकल्प सेवाभावाने मी अर्पण करते अशी भावना फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी व्यक्त केली .
आर एम डी फाऊंडेशनद्वारा संपूर्ण भारतभर प्याऊ -शुद्ध व थंड पिण्याचे पाणी विविध ठिकाणी जसे शासकीय रुग्णालये ,शाळा महाविद्यालय , सार्वजनिक उद्यानं , बाजारपेठा तसेच धार्मिक ठिकाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली . श्री राणा जगजीत सिंह पाटील आमदार तथा विश्वस्त सदस्य यांनी मंदिरास “प्याऊ जल प्रकल्प “ उभारून आर एम डी फाऊंडेशन द्वारे भाविकांची शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली याबाबत देवस्थानच्या व भाविकांच्या वतीने शोभाताई यांचा साडी, श्रीफळ , व भवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला व आभार मानले . कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी धाराशिव ,तहसीलदार ,कमांडंट श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय , देवस्थानाचे जनसंपर्क अधिकारी , प्राचार्य श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, प्रदीप राठी , आकाश राठी अध्यक्ष लातूर अर्बन बँक , चंदकरण लड्डा , आर एम डी फाउंडेशन द्वारा माढा सोलापूर येथे माढा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच लोकार्पण होत असलेले शोभाताई धारीवाल शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे श्री महेश डोके व श्री धनराज शिंदे पदाधिकारी व इतर मान्यवर तथा भाविकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आर एम डी फाऊंडेशन द्वारा निर्मित श्री तुळजा भवानी मंदिरासाठी प्याऊ जलप्रकल्प लोकार्पण सोहळा संपन्न
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
36.1
°
C
36.1
°
36.1
°
4 %
4.2kmh
0 %
Wed
36
°
Thu
41
°
Fri
42
°
Sat
40
°
Sun
42
°