42.9 C
New Delhi
Sunday, June 15, 2025
Homeताज्या बातम्याएसटीच्या जुन्या बसचे होणार सीएनजीत रूपांतर

एसटीच्या जुन्या बसचे होणार सीएनजीत रूपांतर

एसटी उभारणार स्वतंत्र पंप व्यवस्था

पुणे -पुणे एसटी विभागात सध्या जवळपास ८०० पेक्षा जास्त बसेस आहेत. त्यापैकी ७०० ते ७५० बस या मार्गावर धावतात. उपलब्ध असलेल्या बसेसमध्ये ५०० बस जुन्या झाल्या असून, त्या सर्व बस सीएनजीमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे.त्यासाठी बारामती, शिरुर, सासवड आणि मंचर या चार आगारांत स्वतंत्र सीएनजी पंप उभारण्याचे काम सुरू आहे

डीझेलच्या वाढत्या किमती, तुटवडा आणि होणारे प्रदूषण यामुळे डीझेलवरील धावणारी लालपरी (एसटी बस) आता सीएनजीवर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे.त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील शिरूर, राजगुरूनगर, बारामती आणि सासवड या चार आगारांतील एकूण १३२ लालपरी बसना सीएनजीत रुपांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे विभागात एकूण १४ आगार असून, दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांसह पर्यटनासाठी प्रवाशांची हक्काची सेवा असलेली एसटी खर्‍या अर्थाने जीवनवाहिनी ठरत आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने नव्याने इलेक्ट्रिक बस घेण्यावर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान या जुन्या बस डीझेलवर चालणाऱ्या असून, डीझेलच्या वाढत्या किमतीमुळे महामंडळाचा सगळ्यात जास्त खर्च इंधनावर होत असल्याचे दिसते. त्यामुळे आर्थिक तूट निर्माण होते. त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून डीझेलवरील लालपरी सीएनजीवर करण्यात येणार आहे. त्याचा एसटी महामंडळाला फायदा होत असून, येत्या वर्षभरात पुणे विभागातील सर्व डीझेलच्या एसटी बस या सीएनजीवर रुपांतरित करण्यात येणार आहेत.

येत्या दोन- तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, तसेच सासवड आणि शिरूर आगारांतही खासगी गाड्यांना सीएनजी विक्रीची सुविधा करण्यात येणार आहे.

डीझेलची वाढती किंमत आणि प्रदूषणामुळे डीझेलवरील सर्व बसेसचे सीएनजीत रूपांतर करण्यात येणार आहे. सध्या चार आगारांतील १३२ बसेसचे सीएनजीत रूपांतर करण्यात आले आहे. 

– प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
42.9 ° C
42.9 °
42.9 °
36 %
0.7kmh
0 %
Sun
45 °
Mon
43 °
Tue
43 °
Wed
45 °
Thu
42 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!