कोल्हापूर- तूरडाळीच्या दरात आठवडाभरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर १८० ते १८५ रुपयांवर गेले आहेत. अपुऱ्या पुरवठ्यामुळे मागील वर्षभरापासून तूरडाळीचे दर चढेच आहेत. अपुरा पाऊस, काढणीला झालेला अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले आहे.आठवडाभरात तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो सरासरी पाच रुपयांनी वाढ होऊन तूरडाळ १८० ते १८५ रुपये किलोंवर गेली आहे. चणाडाळीच्या दरात सरासरी चार रुपयांची वाढ झाली असून ती ८५ ते ९० रुपये किलोंवर आहे. मूगडाळीचे दर १३० ते १५० रुपये किलो, तर उडीदडाळीचे दर १४० ते १५० रुपयांवर गेले आहेत.अपुरा पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनात घट झाली आहे. तुरीचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच तुरीचे दर तेजीत आहेत. सात हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव असतानाही तुरीची खरेदी सरासरी नऊ ते १० हजार रुपयांनी सुरू आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे तुरीपासून डाळ तयार करताना कमी उतारा मिळत आहे.
ऐन उन्हाळ्यात डाळी महागल्या!
अवकाळीमुळे उत्पादनात घट
RELATED ARTICLES
New Delhi
haze
19.1
°
C
19.1
°
19.1
°
55 %
4.1kmh
20 %
Tue
25
°
Wed
26
°
Thu
23
°
Fri
24
°
Sat
23
°