10.1 C
New Delhi
Tuesday, January 14, 2025
Homeताज्या बातम्याकष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे - ममता सिंधूताई सपकाळ

कष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे – ममता सिंधूताई सपकाळ

-कष्टकरी महिलांचा 'गृहस्वामिनी पुरस्कार' देऊन सन्मान

 

पुणे : कष्टकरी महिला आहेत म्हणून घर आहे,समाज आहे, देश आहे. महिला वेगवेगळ्या बिकट परिस्थितीत काम करत असतात. करोना काळात तर महिलांनी जीवावर उदार होऊन जनतेची सेवा केली. तुमच्या कर्तव्यतत्पर सेवेला माझा मानाचा. मुजरा आहे. अशा शब्दात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांनी एका कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलताना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महात्मा गांधी वसाहत व पाटील इस्टेट झोपडपट्टी वसाहतीमधील २१६ कष्टकरी महिलांचा ‘गृहस्वामिनी पुरस्कार’ देऊन या कष्टकरी महिलांचा खास सन्मान करण्यात आला त्यामध्ये धुणे भांडी काम करणाऱ्या घरेलू कामगार महिला, स्वयंपाक करणाऱ्या, शिलाईकामं करून उदरनिर्वाह करीत स्वतःचा कुटुंबाचा संसार चालवणाऱ्या कष्टकरी महिलांचा समावेश होता.

महात्मा गांधी झोपडी संघ,महात्मा गांधी मित्र मंडळ, चैतन्य मित्र मंडळ, व जेतवन बौद्ध विहार, मोरया मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्धमानाने या गृहस्वामिनी पुरस्कार सोहळा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ममता सिंधुताई सपकाळ आपल्या भाषणात बोलत होत्या.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ममता सिंधुताई सपकाळ,प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या संचालिका डॉ निवेदिता एकबोटे, चित्रपट निर्माते बाळासाहेब बांगर, पुण्याचे पॅड मॅन योगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते कुमार रेणुसे, प्रसिद्ध महिला वकील वृंदा कारंडे, प्रसिद्ध वकील शशिकांत बागमार, सामाजिक कार्यकर्ते राजू साने सायली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी आपल्या भाषणात बोलताना ममता सिंधुताई सपकाळ म्हणाल्या कि, आज प्रत्येक घरात कष्टकरी महिला आहेत अगदी होममेकर पासून घरकाम करणाऱ्या स्वयंपाक करणाऱ्या, लहान मुलांना सांभाळून स्वतःचा संसार करणाऱ्या कष्टकरी महिला आहेत या महिलांचा त्याग, प्रामाणिकपणे कष्ट करण्यासाठी चाललेली धडपड, आदर्शवृत्ती, आणि मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांचे होणारे प्रयत्न यामधून समाजाला प्रेरणा मिळते नागरिकांना चांगले काम व कष्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

यावेळी डॉ एकबोटे म्हणाल्या, कष्टकरी महिलांमुळे समाजात आदर्श नागरिक निर्माण होतात.या समारंभात चित्रपट निर्माते बांगर, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, आदींची भाषणे झाली.

ऍड स्वप्निल जोशी यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ अडसूळ यांनी उपस्थितीतांचे आभार मानले. गोपाळ देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. हिरा शिवांगी, सौं सुवर्णा गायकवाड, सौं प्रतिभा गायकवाड, सारिका कांबळे, अविनाश भेकरे, अजय शिवांगी, सनी करोसे, भालचंद्र वाघ, राजू भेकरे,रॉनी थापा,अजय जगताप आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
10.1 ° C
10.1 °
10.1 °
100 %
2.6kmh
100 %
Tue
22 °
Wed
22 °
Thu
19 °
Fri
22 °
Sat
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!