मुंबई आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने (Gokul Dairy) दुधाच्या दरात वाढ केली आहे. गोकुळने गाईच्या दुधाच्या विक्रीत दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ दूध संघाने ही दरवाढ केवळ मुंबई आणि पुण्यात केली असून १ जुलैपासून नवीन दरवाढ लागू करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी असते. या दरवाढीमुळे मुंबई-पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गोकुळकडून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे जाहीर केलं आहे. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, मात्र सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रूपये दरवाढ केली आहे.milk powder या पुढे मुंबई आणि पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपये ऐवजी ५६ रूपयांनी मिळेल. ही दरवाढ फक्त मुंबई आणि पुण्यासाठी लागू असणार आहे. अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.gokul dairy
मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल ३ लाख लिटर तर पुणे शहरात ४० हजार लिटर मागणी आहे. दूधाची दरवाढ मुंबई आणि पुण्यातच करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात ही दरवाढ करण्यात येणार नाही, असं गोकुळ दूध संघाकडून सांगण्यात आलं आहे.
दुग्धजन्य पदार्थ आणि दुधाची भूकटी यामध्ये मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे होणारा खर्च आणि तोटा याचा कमी करण्यासाठी गोकुळने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. राज्यातील इतरही दूध उत्पादक संघांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. यामुळे गोकुळलाही दुधाच्या दरात वाढ करावी लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.