14.1 C
New Delhi
Monday, December 2, 2024
Homeताज्या बातम्या…तर एकाही पक्षाला धनगर मतदान करणार नाहीत!

…तर एकाही पक्षाला धनगर मतदान करणार नाहीत!

सकल धनगर समाजाचा एल्गार; संभाजीनगर येथे एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण

पुणे: भारतीय संविधानाने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे आमरण उपोषण करण्यात येईल. यामध्ये ५०० तरुण आमरण उपोषण करतील. एसटी आरक्षणासंदर्भात राज्यातील प्रमुख पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. एसटी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही, तर येत्या निवडणुकांत धनगर समाज एकाही पक्षाला मतदान करणार नाही, अशी ठोस भूमिका सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आली. धनगर समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास लवकरच संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे उपोषण करण्यात येणार असल्याचा ठरावही अधिवेशनात पारित करण्यात आला.

सकल धनगर समाजाच्या वतीने गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव पारित करण्यात आले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी, राजकीय भूमिका, आरक्षणासाठीचा न्यायालयीन व रस्त्यावरील लढा, आगामी निवडणुकीच्या संदर्भाने धनगर समाजाची भूमिका ठरवण्यासाठी धनगर समाजातील सुशिक्षित तरुण अभ्यासक, उपोषणकर्ते, कार्यकर्ते एकवटले होते.

धनगरांना एसटी आरक्षण, विधानसभा निवडणुकीत योग्य प्रतिनिधित्व, धनगरांचे एकीकरण, कलम ३४२ (१) नुसार राज्यपालांनी धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी, डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करावा आदी ठराव करण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्रातील धनगर बहुल मतदारसंघातून यशवंत संदेश यात्रा काढण्याचा निर्णय झाला असून, विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाडण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचे अधिवेशनात स्पष्ट करण्यात आले.

अधिवेशनातील प्रमुख ठराव

  • धनगड ऐवजी धनगर हीच जमात अधिकृत असल्याची दुरुस्ती करावी
  • कलम ३४२ (१) नुसार राज्यपालांनी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी
  • डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल तातडीने सरकारने सादर करावा.
  • एसटी आरक्षणाची आठ दिवसांत अंमलबजावणी करावी
  • संभाजीनगर येथे ५०० युवक आमरण उपोषण करणार
  • राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार
  • उपोषणकर्ते यशवंत संदेश यात्रा महाराष्ट्रातील मतदारसंघातून फिरवणार
  • आरक्षण शिष्टमंडळ व प्रतिनिधी शिष्टमंडळ स्थापन करणार
  • खिलारे कुटुंबाची जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावी
  • धनगरांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाच्या पाठीशी उभे राहावे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
14.1 ° C
14.1 °
14.1 °
88 %
1.5kmh
0 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!