एकतर तुम्ही मोदींच्या बाजूने असता किंवा विरोधात असता. मी २०१९ ला जे बोललो आहे ते आजच्या विरोधी पक्षांत बोलायची हिंमत नाही. माझा हेतू स्पष्ट होता, उद्देश पारदर्शी होता. जर समजा अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद भाजपाने मान्य केलं असतं तर आज बोलला असतात का हे, असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. “जे आज बोलत आहात ते बोलला असतात का. कारण सत्तेचा बोळा कोंबला असता. ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली”, अशीही टीका त्यांनी केली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आज कणकवलीत नारायण राणे यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी महायुतीला पाठिंबा का दर्शवला याबाबत पुन्हा एकदा माहिती दिली. तसंच, नरेंद्र मोदी सरकारमुळेच राम मंदिर होऊ शकलं, असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, यावेळी मी ठरवंल होतं की मुलाखती द्यायच्या नाहीत. पाठिंबा जाहीर केल्यानंतर ही माझी पहिली जाहीरसभा. २०१४ ते २०१९ च्या दरम्यान मोदींकडून ज्या गोष्टी झाल्या, ज्या मला पटल्या नाहीत त्याबाबत मी २०१९ च्या सभेत स्क्रीनवर दाखवून जाहीर विरोध केला होता. काही गोष्टी मला पटल्या. पण काही गोष्टी पटल्या नाहीत. आजही नाही पटत. आणि मला असं वाटतं की या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे. या गोष्टी पटलेली नाही. या गोष्टी पटल्या. मग नोटबंदीची असेल. पुतळ्यांची असेल. अनेक गोष्टींची असेल. ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या नाहीच पटल्या. ज्या पटल्या त्यांचं जाहीर कौतुक करणारा माणूस मी आहे.”
नरेंद्र मोदी सरकारमुळेच राम मंदिर होऊ शकलं
मित्राचीही खरडपट्टी काढायला मागे पुढे पाहता कामा नये आणि दुश्मनाची स्तुती करताना मागे पुढे पाहू नये - राज ठाकरे
RELATED ARTICLES
New Delhi
haze
31.1
°
C
31.1
°
31.1
°
35 %
2.6kmh
0 %
Thu
32
°
Fri
33
°
Sat
33
°
Sun
33
°
Mon
33
°