30.1 C
New Delhi
Tuesday, October 21, 2025
Homeताज्या बातम्यानागपंचमी ला शहरामध्ये झोका बांधण्यासाठी मोठी झाडेच नसल्यामुळे महिला वर्गामध्ये नाराजी

नागपंचमी ला शहरामध्ये झोका बांधण्यासाठी मोठी झाडेच नसल्यामुळे महिला वर्गामध्ये नाराजी

कुु दुर्गा भोर अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांची शासनाला विचारणा

दुर्गा भोर(अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य)

भोसरी-शहरामध्ये वाढते शहरीकरण पाहता शहरात कामाच्या निमित्ताने विविध ग्रामीण भागातून अनेक महिला वर्ग हा आलेला आहे परंतु नागपंचमी सारख्या सणांना अनेक ग्रामीण भागामध्ये खूप मोठे महत्त्व आहे अनेक ठिकाणी हा सण दिवाळी सारखा साजरा केला जातो ,अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आणि पूर्वी शहरी भागांमध्ये देखील अनेक चौकांमध्ये झोके बांधलेले असायचे, त्या झोक्यावर आलेल्या माहेरवाशील नागपंचमीचा आनंद लुटायच्या परंतु शासनाने आधुनिकरणाकडे पाऊल टाकले आणि पूर्वीच्या परंपरांना बगल देत फक्त शहरीकरण आणि सिमेंटची जंगले वाढविण्यामध्ये भर दिल्याचे दिसून येत आहे.

आज नागपंचमी निमित्त अनेक महिलांनी आपल्या मनातील खंत दुर्गा ब्रिगेड संघटना अध्यक्ष दुर्गा भोर यांच्यापुढे मांडली आणि पुढील काळामध्ये शहरांमध्ये नागपंचमी सारख्या सणांना महिला वर्गाला झोका बांधण्यासाठी मोठ्या वृक्षांची निर्मिती झालीच पाहिजे जेणेकरून आपली परंपरा ही जपली जाईल आणि येणाऱ्या पिढीला अशा सणांचे महत्त्व समजेल असे मत कु दुर्गा भोर अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना यांनी आज प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
51 %
1.5kmh
64 %
Tue
32 °
Wed
34 °
Thu
33 °
Fri
33 °
Sat
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!