32.3 C
New Delhi
Tuesday, April 22, 2025
Homeताज्या बातम्यानाट्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती

नाट्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती

एकजुटीनं .. दुरदृष्टिनं चला गाजवू मैदान

 

पिंपरी : एकजुटीनं .. दुरदृष्टिनं चला गाजवू मैदान.., राष्ट्रहितासाठी करायचं मतदान..,  लोकशाहीचा करायचा सन्मान..,१०० टक्के हो करायच मतदान.., लोकशाहीचा करायचा सन्मान.. हा वासुदेवांचा आवाज अलीकडे मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवड मध्ये सकाळी घुमत असल्याचे दिसते. निमित्त आहे लोकसभा निवडणुकीचे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी – चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या संकल्पनेतून शहराच्या विविध भागात ही मतदान जनजागृती होत आहे. 

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्याचे मतदान पार पडले मात्र त्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी झालेली दिसते आहे, यामुळे आपल्या मावळ लोकसभा मतदार संघात मतदारांना मतदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी अ. भा. नाट्य परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले. 

पुढे बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, मतदान जनजागृती करत असलेले वासुदेव हे नाट्याकर्मी नसून खरेखुरे वासुदेव आहेत. त्यांच्या मार्फत लोक गीतांच्या माध्यमातून ही जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील नव मतदार असलेल्या तरुणाईने मतदानासाठी घराबाहेर पडावे,  आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो? अशी भूमिका काही लोक घेत असतात त्यांनाही मतदान केंद्रापर्यंत जा, मतदान करून आपले कर्तव्य बजवावे असे आवाहन हे वासुदेव करत आहेत. शहरातील उद्याने, सोसायट्या आणि विविध भागात सकाळी ६ ते १० या वेळेत ही जनजागृती करण्यात येत आहे. या मतदान जनजागृती साठी वासुदेवांना मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गांचे नियोजन आदि बाबी नाट्य परिषदेच्या वतीने राजेंद्र बंग, आसाराम कसबे, संतोष रासने सांभाळत असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.3 ° C
32.3 °
32.3 °
5 %
2.2kmh
1 %
Tue
40 °
Wed
41 °
Thu
42 °
Fri
43 °
Sat
43 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!