27.1 C
New Delhi
Wednesday, October 29, 2025
Homeताज्या बातम्यानिवडणूक काळात देशभरात 8 हजार 889 कोटींचे घबाड जप्त

निवडणूक काळात देशभरात 8 हजार 889 कोटींचे घबाड जप्त

देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर आणि मतदारांना दाखवण्यात येणाऱ्या इतर प्रलोभनांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार देशभरातील विविध संस्थांनी तब्बल 8 हजार 889 कोटी रुपयांचे घबाड जप्त केले आहे. त्यामध्ये रोख रक्कम, मद्य, सोने आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. अंमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे तसेच इतर प्रलोभनांविरूद्ध वाढीव दक्षतेमुळे हे पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले जात असून जप्ती प्रकरणात सतत वाढ झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

खर्चाचे निरीक्षण, उपलब्ध माहितीचा अचूक अर्थ लावणे आणि अंमलबजावणी संस्थांचा सक्रिय सहभाग या बाबींमध्ये जिल्हे आणि संस्थांचा नियमित पाठपुरावा आणि पुनरावलोकने यामुळे 1 मार्चपासून जप्तीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. निवडणुकांवर वेगवेगळ्या प्रमाणात प्रभाव टाकणारे अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, मोफत वस्तू तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यातील काही घटक थेट प्रलोभन म्हणून दिले जातात तर काही वेळा पैशाच्या रुपाने मतदारांना प्रलोभित केले जाते.

आयोगाने अंमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे जप्त करण्यावर विशेष भर दिला आहे. जी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश संक्रमण प्रदेश होती, ती वाढत्या प्रमाणात उपभोग क्षेत्र बनत असल्याचे माहिती विश्लेषणात आढळून आले आहे. “निवडणुकांच्या काळात अंमली पदार्थांच्या व्यापारात काळ्या पैशांचा वापर उखडून टाकण्यासाठी, त्याहून अधिक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक कारण म्हणजे तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि त्याद्वारे देश वाचवण्यासाठी अंमली पदार्थांच्या विरोधात तपास यंत्रणांचे बुद्धिमत्ता आधारित अचूक सहयोगी प्रयत्न ही काळाची गरज आहे.” असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एका आढावा बैठकीदरम्यान नोडल संस्थांना संबोधित करताना सांगितले होते. आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये म्हणजे एकूण जप्तीच्या 45 टक्के इतका आहे.

या निवडणुकांदरम्यान अमली पदार्थांच्या विरोधात लक्ष्यित कृतींची मालिका पाहायला मिळाली आहे.  गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली व्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.  17 एप्रिल रोजी नोएडा पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथे अमली पदार्थांच्या कारखान्याचा पर्दाफाश करत 150 कोटी रुपये किमतीचा 26.7 किलो MDMA हा अंमली पदार्थ जप्त केला असून दोन परदेशी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. इतर  घटकांच्या जप्ती देखील तितक्याच प्रभावी असून या वर्षातील जप्तीच्या कारवायांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या संपूर्ण जप्तींच्या आकडेवारी आणि प्रमाणाला मोठ्या अंतराने मागे टाकले आहे. सूक्ष्म आणि व्यापक नियोजन यामुळेच तपास संस्थांना हे यश प्राप्त झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
27.1 ° C
27.1 °
27.1 °
54 %
1.5kmh
40 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!