पुणे : गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात नूतन वर्षाचे स्वागत करीत श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासून गर्दी केली. पहाटे ४ वाजल्यापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने नूतन वर्षारंभानिमित्त मंदिराला आकर्षक पुष्परचना करण्यात आली. सकाळपासून अभिषेक शृंगार, सुप्रभात आरती, नैवेद्यम आरती, दुपारी माध्यान्ह आरती, सायंकाळी महामंगल आरती आणि रात्री शेजाआरती करण्यात आली. यावेळी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
![](https://tiptop24news.com/wp-content/uploads/2025/01/Ganpati-03-1024x681.jpg)
नूतन वर्षारंभी जशी सजावट करण्यात आली होती, त्याचप्रमाणे बुधवार निमित्त मंदिरात दैनंदिन अभिषेक, सहस्त्रावर्तन पूजा, सहस्त्रावर्तन संकल्प, शिशु पूजन सेवा, वैयक्तिक गणेश याग देखील झाला. भाविकांनी यामध्ये देखील मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता. अनेकांनी रस्त्यावरुनच श्रीं चे दर्शन घेत नवे वर्ष सुख समृद्धीचे जावो, अशी प्रार्थना केली