पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर annasaheb magar college महाविद्यालयात माजी संघटना व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माजी स्नेहविद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले, कृष्णकांत कोबल, प्रशांत सुरसे, सचिव प्रा. नितीन लगड, खजिनदार सुनील बनकर, डॉ.जयंत टिळेकर, डॉ. शोभा पाटील, अरुण झांबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. नाना झगडे माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉ. गंगाधर सातव आदी उपस्थित होते.eudcation
माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण काम करत आहोत. प्रवेश फी भरू न शकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपण मदत करत असतो. माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा व स्मरणिका प्रकाशित करणार आहे. असे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनीमहाविद्यालयात शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी ही महाविद्यालयाची संपत्ती असते. असे सांगत महाविद्यालयातील college शैक्षणिक पायाभूत सुविधांची माहिती दिली.
दरम्यान अण्णासाहेब मगर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक व विद्यार्थी हीतासाठी कायम पुढाकार घेणारे आपले सहकारी चार्टर्ड आकौंटंट मच्छिंद्र कामठे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी अरुण झांबरे, प्रशांत सुरसे, सुनील बनकर, श्रीकांत टाकले,राजेंद्र राऊत, डॉ.जयंत टिळेकर, डॉ. शोभा पाटील, प्रीती कदम, दत्ता शिंगोटे, इसाक शेख, डॉ. सुनीता डाकले, अपर्णा गुंजाळ, प्रदीप ढवळे आदी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविषयीच्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णकांत कोबल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार डॉ. गंगाधर सातव यांनी मानले.