पुणे : पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेय. हवामान खात्याने चार दिवस पुण्यात पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस पडतोय. विजांच्या कडाक्यासह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. अचनाक आलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीेचे वारे सुरु आहे. येत्या 13 मेला मतदान होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असल्याने पुण्यात विविध पक्षाकडून सभा आणि रोड शोचं आयोजन करण्यात आले होते. पुण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशातच विमाननगर परिसरात एक झाड थेट वाहनावर कोसळले. त्या वाहनामागून भोसरीतील भाजपचे आमदार महेश लांडगे येत होते. त्यांच्या समोरच्या वाहनावर झाड कोसळल्याचं पाहून लांडगे त्यांच्या मदतीला धावले. लांडगे सह उपस्थितांनी वाहनातील सर्वांना बाहेर घेतले. सुदैव इतकेच की झाड छोटे होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

१) सहकार नगर, सारंग सोसायटी
२) काञज, शेलार मळा
३) सातारा रोड, पद्मावती मंदिर
४) सिहंगड रोड, हेलिऑन शाळेजवळ
५) शिवाजीनगर, मॉडल कॉलनी
६) कोथरुड, महात्मा सोसायटी

७) कर्वेनगर, शारदा निकेतन मुलींचे वसतिगृह
८) कोथरुड, डिपी रोड ५ चारचाकी वाहनावर झाड पडले
९) शिवणे, दांगट पाटील इंडस्ट्रीयल इस्टेट
१०) कोरेगांव पार्क, विद्युत नगर सोसायटी
११) भवानी पेठ, जैन मंदिर जवळ
१२) एफसी रोड, हॉटेल वैशाली मागे
१३) एरंडवणा, सेवासदन शाळेजवळ चारचाकी वाहनावर झाड पडले
१४) टिंगरे नगर, साईबाबा मंदिरा जवळ
१५) पाषाण, सुस रोड

१६) वडगाव शेरी, नामदेव नगर
१७) कोथरुड, तेजस नगर चारचाकी वाहनावर झाडपडी
१८) कोथरुड, राहुल नगर
१९) सेनापती बापट रोड
२०) कोथरुड, डहाणूकर कॉलनी
२१) नाना पेठ पोलिस चौकीसमोर