लोणावळा येथे वर्षासहलीसाठी आलेल्या ६ पर्यटकांचा भुशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना लक्षात येताच स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बुडालेल्या व्यक्तींची शोध मोहीम सुरु करण्यात आली व त्यामध्ये ३ मृतदेह सापडले. तसेच शिवसेना पुणे शहराचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या सूचनेनुसार एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पर्यटनासाठी गेलेले एकाच कुटुंबातील ५ सदस्य भुशी डॅम मध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल येथून हे पुण्याच्या हडपसरमधून आलेले अन्सारी कुटुंब वाहून गेले आहे.
ही घटना लक्षात येताच स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बुडालेल्या व्यक्तींची तातडीने शोधमोहीम सुरु केली. त्यामध्ये ३ जणांचे मृतदेह सापडले असून २ बेपत्ता असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. शाहिस्ता परवीन (४०), अमीन अन्सारी (१३), मारिया अन्सारी (६), हुमेरा अन्सारी (६) आणि अदनान अन्सारी (६) अशी बुडालेल्या व्यक्तींची नावे आहेत.