30.1 C
New Delhi
Saturday, May 10, 2025
Homeताज्या बातम्याभूसंपादनाबाबत गती पकडावी- ना. चंद्रकांत पाटील

भूसंपादनाबाबत गती पकडावी- ना. चंद्रकांत पाटील

पुणे- नुकतेच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाबाबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्ष प्रदेशाध्यक्ष बदलणे, न बदलणे हा केंद्राचा विषय आहे. पण साधारणत: दर तीन वर्षांनी आमची सगळी कार्यकारणी बदलत असते. ही लोकशाही प्रक्रिया आता आमच्याकडे सुरू आहे. पक्ष सदस्यता मग, सक्रिय सदस्यता आणि लोकशाही मार्गाने सर्व स्तरावर निवडणुका होत असतात.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुशासन दिनानिमित्त सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला.यावेळी त्यांनी महामेट्रोचे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला. त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट दोनची पाहणी केली.आ. हेमंत रासने, भाजपचे सरचिटणीस रवी साळेगावकर, प्रमोद कोंढरे स्वरदा बापट, डॉ. संदीप बुटाला यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो. पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून सरासरी पावणे दोन लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात. उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून, मेट्रोने प्रवास देखील करत आहोत.६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडपणे सुरु आहे. त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे. मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकार तर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल.

पुणे शहरात दोन महापालिकांच्या प्रस्तावाबाबत विचारले असता ते म्हणाले, याचा अंतिम निर्णय हा शेवटी राज्याचे मुख्यमंत्री हे करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पुणे शहराचे सर्वच प्रश्न माहीत आहेत. पण आम्ही १५ जानेवारीला पुण्याच्या प्रश्नांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट मागितली आहे. याच्या एक आठवड्यापूर्वी पुण्याचे महत्त्वाचे प्रकल्प आणि प्रश्न आम्ही त्यांना देणार आहोत. ३४ गावांच्या समावेशानंतर पुणे महापालिका ही आशियातील सर्वात मोठी भौगोलिक क्षेत्र असलेली महापालिका झाली आहे. त्यामुळे प्रशासन म्हणून ती चालवणे अवघड आहे, म्हणून दोन महानगरपालिका केल्या पाहिजेत आणि हे आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर समोर मांडणार आहोत.

पाटील यांना पुरंदर विमानतळा संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले, पुरंदर विमानतळाच्या सर्व परवानग्या झाल्या असून, भूसंपादनाबाबत गती पकडावी लागणार आहे. याला दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, या विषयात राज्याचे मुख्यमंत्री निर्णय करतात. तसेच त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून निर्णय करतील. तसेच आमच्या पालकमंत्री पदाच्याबाबत कोणताही फॉर्म्युला नसून समन्वय हा आमचा फॉर्म्युला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
54 %
1.5kmh
20 %
Fri
32 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
43 °
Tue
43 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!