पुणे- ६ मार्च २०२४ रोजी रुबी हॉल क्लीनिकpune metro मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक या मार्गाचे उद्घाटन झाल्यानंतर पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये निरंतर वाढ होताना दिसत आहे. १ जुलै ते ३१ जुलै २०२४ या काळात सुमारे ३१,२०,२९३ प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला. दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या १,०६,१०१ इतकी राहिली. या काळात मेट्रोला ४,९८,०४,८१७ रुपये इतके उत्पन्न मिळाले. एकूण प्रवासी संख्येपैकी १०,७०,६५५ प्रवाशांनी पीसीएमसी मेट्रो स्थानक ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक (मार्गिका १) यावर प्रवास केला व २०,४९,६३८ प्रवाशांनी वनाझ मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक (मार्गीका २) यावर प्रवास केला. वनाझ मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक या मार्गिकेची प्रवासी संख्या पीसीएमसी मेट्रो स्थानक ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक या मार्गापेक्षा जास्त आहे असे निदर्शनास आले आहे.
पुणे मेट्रोच्या एक पुणे कार्डलादेखील प्रवाशांची पसंती लाभली आहे. आत्तापर्यंत ५३,०२५ कार्ड विकले गेले असून त्यापैकी ११,६४६ हे विद्यार्थी कार्ड आहेत. पुणे मेट्रोच्या विद्यार्थी पासवर प्रवासी भाड्यामध्ये ३०% सवलत असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर हे कार्ड वापरत आहेत. ramwadi
पुणे मेट्रोची pune metroसध्या २४ स्थानके कार्यरत असून जास्त प्रवासी संख्या पीसीएमसी pcmcस्थानक (अंदाजे १४००० प्रवासी प्रतिदिन) रामवाडी स्थानक (अंदाजे ११००० प्रवासी प्रतिदिन), पुणे रेल्वे मेट्रो स्थानक (अंदाजे ८००० प्रवासी प्रतिदिन), वनाझ स्थानक (अंदाजे ७५०० प्रवासी प्रतिदिन), नळ स्टॉप स्थानक (अंदाजे ७००० प्रवासी प्रतिदिन) या ५ स्थानकांत नोंदविली गेली आहे. जिल्हा न्यायालय इंटरचेंज मेट्रो स्थानकात अंदाजे दैनंदिन २४,८७८ प्रवासी पर्पल ते अक्वा तथा अक्वा ते पर्पल मार्गिका बदलून प्रवास करतात हे निदर्शनास आले आहे.
पुणे मेट्रो आणि पीएमपीएमएल यांच्या संयुक्त विद्यमानाने सध्या १३ मार्गांवर फिडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या दैनंदिन १०,००० पेक्षा जास्त प्रवासी या फिडर सेवेचा लाभ घेत आहेत. रामवाडी स्थानक ते विमानतळ या फिडर बस सेवेचा लाभ प्रतिदिन ४०० पेक्ष्या जास्त प्रवासी घेत आहेत, तर नुकतीच सुरू केलेली रामवाडी मेट्रो स्थानक ते EON IT पार्क या फिडर बस सेवेचा लाभ प्रतिदिन १००० पेक्षा जास्त प्रवासी घेत आहेत. मेट्रो व पीएमपीएमएल अधिकाधिक मार्गावर फिडर बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
रुबी हॉल क्लीनिक मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक ही मार्गीका ६ मार्च २०२४ रोजी खुली करण्यात आली. त्याआधी दैनंदिन प्रवासी संख्या ५५,००० होती. त्यानंतर तीन महिन्यात प्रवासी संख्या एक लाख पार झाली आहे. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डिकर यांनी म्हटले आहे की, “पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत होणारी निरंतर वाढ निश्चित उत्साहवर्धक आहे. वाढत्या प्रवासी संख्येमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होताना दिसत आहे. पुणे मेट्रोची आत्तापर्यंत ५३,०२५ एक पुणे कार्ड प्रवाशांनी घेतली आहेत, त्यामुळे त्यांना विनासह्यास मेट्रो मधून प्रवास करणे शक्य होत आहे. पुणे मेट्रोच्या रामवाडी मेट्रो स्थानक ते विमानतळ आणि रामवाडी मेट्रो स्थानक ते EON IT पार्क फिटर सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिकाधिक मार्गावर पीएमपीएमएल व महा मेट्रो फिडर सेवा सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत.