मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा जोर वाढला आणि धो-धो पावसाने नदीला पूर आला, त्यामुळे नागरिकांना पुन्हा स्थलांरीत करण्याची वेळ आली.
अतिवृष्टीमुळे पुण्यात अनेक भागात नुकसान झाले आहे. या भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येणार आहेत. यावेळी नागरिकांशी मुख्यमंत्री संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.