नवी दिल्ली – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल इन्स्टिट्यूट या केंद्र शासनाच्या संस्थेकडून येरवडा कारागृह मुद्रणालयाचे कामगार नेते तसेच महाराष्ट्र गव्ह. प्रेसेस फेडरेशनचे अध्यक्ष राहुल कडू यांना राष्ट्रीय उत्कृष्ट कामगार नेतृत्व पुरस्कार २०२४ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते न्यू महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातील सर्व मुद्रणालयीन कामगारांचे प्रश्न राहुल कडू यांच्या कार्यकाळात मार्गी लागले असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील मुद्रणालयीन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे अथक व प्रामाणिक प्रयत्न सुरू असून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा यांच्याकडून जुनी पेन्शन योद्धा कर्मचारी पुरस्कार 2024 राहुल कडू यांना महाराष्ट्राचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्या हस्ते ही त्यांना मिळालेला आहे.
त्यांनी कामगारांसाठी मोठे योगदान दिल्याने त्यांच्या यशस्वी कार्याची दखल दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गॉगल इन्स्टिट्यूटने घेऊन त्यांना राष्ट्रीय उत्कृष्ट कामगार नेतृत्व पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कामगार नेते राहुल कडू यांना हा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री विजय राज, मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद, खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेते विनोद तावडे, खासदार निलेश लंके, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार अमोल कोल्हे आदींनी राहुल कडू यांचे अभिनंदन केले. यावेळी संसद भवन राष्ट्रपती भवन यांना भेट देण्याचा बहुमान राहुल कडू यांना मिळाला पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील कामगार संघटनांनी तसेच मुद्रणालयीन कामगार संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रीय उत्कृष्ट कामगार नेतृत्व या पुरस्काराने राहुल कडू यांचा सन्मान…
RELATED ARTICLES
New Delhi
mist
15.1
°
C
15.1
°
15.1
°
82 %
2.6kmh
40 %
Wed
17
°
Thu
22
°
Fri
22
°
Sat
22
°
Sun
23
°