मनसेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर बहुजन विकास आघाडीची वाट धरली. ‘वंचित’च्या प्रकाश आंबेडकरांनी पुणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर केली आहे. आता मोरे यांना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी रोडरोलर हे चिन्ह बहाल केले आहे. पुण्यात आता महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद धंगेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एमआयएमचे अनिल सुंडके अशी चौरंगी लढत होणार आहे. पुण्यात 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही निवडणूक मोरे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. जागावाटपाचा तिढा अखेरपर्यंत न सुटल्याने वंचित बहुजन विकासचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा केली. त्यानुसार पुणे लोकसभेसाठी आंबेडकर यांनी वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर मोरे यांनी वंचित विकासमध्ये प्रवेश केला आहे.
वसंत मोरे यांना कोणते मिळाले चिन्ह !
पुण्यात चौरंगी लढत होणार
RELATED ARTICLES
New Delhi
smoke
23.1
°
C
23.1
°
23.1
°
64 %
1.5kmh
75 %
Tue
28
°
Wed
32
°
Thu
32
°
Fri
31
°
Sat
33
°


