25.1 C
New Delhi
Sunday, December 1, 2024
Homeताज्या बातम्यावारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती

मुंबई-महायुती सरकारचा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. त्यात त्यांनी वारकऱ्यांसाठी काही ठळक घोषणा केल्या आहेत. यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यांतील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रुपयांचा निधी देण्याच्या घोषणेचा समावेश आहे तसेच,
“निर्मल वारी” साठी निधी तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू- आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार करण्याची घोषणा करण्यात आली.


यानिमित्ताने वारकऱ्यांच्या वतीने विधिमंडळ परिसरात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना विठ्ठलाची मूर्ती देऊन वारकऱ्यांनी आभार मानले.

“राज्यात स्वच्छ आणि निर्मल वारी झाली पाहिजे यासाठी सर्व खबरदारी सरकार कडून घेण्यात येणार, यासह वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय राज्य शासनाकडून घेण्यात येईल”, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेने द्वारा आयोजित विधानभवन परिसरात वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला
यावेळी वारकरी सेवा रथाचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या उपस्थित होत्या. तसेच वारकरी अक्षय महाराज भोसले (प्रदेशाध्यक्ष शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना), शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे, दिनेश शिंदे , योगेश केदार यांच्यासह अनेक वारकरी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
25.1 ° C
25.1 °
25.1 °
33 %
4.1kmh
0 %
Sun
26 °
Mon
27 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!