34.8 C
New Delhi
Sunday, July 13, 2025
Homeताज्या बातम्याविद्यमान आमदारांना पिंपरीतून होतोय विरोध

विद्यमान आमदारांना पिंपरीतून होतोय विरोध

काम न करण्याची घेतली शपथ

पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आक्षेप घेतला आहे. आमदार बनसोडे नगरसेवकांना विश्वासात घेत नव्हते. लोकांना भेटत नव्हते अशी पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असून बहल यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात महायुतीतील माजी नगरसेवकांनी नाराजी दर्शवत त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. अजित पवारांच्या बंडाच्या वेळी शेवटपर्यंत साथ देणाऱ्या आमदार अण्णा बनसोडे यांना अजित पवार उमेदवारी देणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पिंपरीतील हॉटेलमध्ये महायुतीतील चारही घटक पक्षांच्या माजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी बैठक घेऊन आपली दिशा स्पष्ट केली आहे. पिंपरी विधानसभेसाठी विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना अनेक माजी नगरसेवकांनी विरोध केला आहे. महायुतीकडून पिंपरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे येणार असल्यामुळे, अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, त्यांचे काम न करण्याची शपथ नगरसेवकांनी घेतली.यावेळी भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे, राजेश पिल्ले, आरपीआय आठवले गटाच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक रोहित काटे, काळूराम पवार, राजू बनसोडे, डब्बू आसवानी, नारायण बहिरवडे, प्रसाद शेट्टी, शेखर घुले, तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी एकत्रित येत शपथ घेतली.या बैठकीत नगरसेवकांनी एकत्र येऊन अण्णा बनसोडे यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार केला, जो आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरू शकतो. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली तर आम्ही त्यांचे काम करणार नाही असाही निर्धार व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
34.8 ° C
34.8 °
34.8 °
47 %
3.1kmh
85 %
Sun
35 °
Mon
39 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!