पुणे : औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी लोकसभा निवडणूकीत मतदानाचा १०० टक्के हक्क बजाविणे अपेक्षित असून याकरिता किमान ५० कर्मचारी संख्या असलेल्या अस्थापनांसाठी ७ मे व १३ मे रोजी ‘आमचे कर्मचारी, आमचा अभिमान’ ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून या स्पर्धेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात कामगार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात किमान २०० कर्मचारी अस्थापनेवर असलेले बरेच औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग आहेत. उद्योगसंस्थेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांनी मतदान केल्यानंतर मतदान केंद्राच्या विहित १०० मीटर मर्यादेच्या बाहेर येवून आपला सेल्फी काढावा. संबंधित कंपन्यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचे सेल्फी कर्मचारी यादीसह जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ९२७०१०५५९३ या व्हॉटसअॅप नंबरवर पाठवावेत. हे सेल्फी पाठवतांना कंपनीने कर्मचाऱ्याचे नाव, आडनाव, कंपनीचे नांव, विधानसभा मतदारसंघाचे नाव, मतदार यादी किंवा मतदार यादीभाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक इत्यादी माहिती द्यावी.सर्व औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांनी १०० टक्के मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होवून मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे व मतदान करण्याबाबत जनजागृती करावी. कर्मचाऱ्यांचे १०० टक्के मतदान झाल्यास उद्योगसंस्थांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.याकरिता सर्व औद्योगिक व माहिती तंत्रज्ञान आस्थापनावर असलेले एकूण कर्मचारी संख्या तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदान केल्याचे प्रमाणपत्र इत्यादी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास ७ व १३ मे रोजी slaopune13@gmail.com या ई-मेलवर सादर करावी, असेही जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा- डॉ. सुहास दिवसे
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 'आमचे कर्मचारी, आमचा अभिमान' स्पर्धा
RELATED ARTICLES
New Delhi
light rain
36.6
°
C
36.6
°
36.6
°
37 %
0.7kmh
99 %
Sat
35
°
Sun
40
°
Mon
38
°
Tue
35
°
Wed
35
°