29.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeताज्या बातम्यासर्वांनी मतदान करावे- आयुक्त शेखर सिंह

सर्वांनी मतदान करावे- आयुक्त शेखर सिंह

पिंपरी चिंचवड शहरात बाईक रॅली व जनजागृती

पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरातील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, शहरातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती करण्यात येत असून विशेषतः नवोदित मतदार, महिला मतदार याकरिता महिला बचत गट, सोसायट्या, उद्याने, माॅल यासारख्या सर्व क्षेत्रात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून शहरातील प्रत्येक मतदाराने लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक येथे भव्य दुचाकी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त सिंह बोलत होते.या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे,कार्यकारी अभियंता नितिन देशमुख,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम. शिंदे, कार्यालय अधीक्षक रमेश डाळिंबे,नागनाथ दहिफळे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.लोकसभा निवडणूकीसाठी महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज शहरात भव्य दुचाकी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.भक्ती शक्ती चौक येथे जमलेल्या सर्व रायडर्सनी “आम्ही लोकशाहीवर निष्ठा ठेवून, निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला.आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. निगडी येथून निघालेली ही रॅली वाल्हेकरवाडी -थेरगाव- काळेवाडी – पिंपरी सौदागर – रहाटणी या मार्गानी रवाना होत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भवनात दाखल झाली. मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात सहभागी रायडर्स॔ना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते त्यांच्या या सामाजिक बांधिलकीतून रॅलीद्वारे केलेल्या मतदान जनजागृती उपक्रमाबद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.आजच्या या रॅलीसाठी ४५८ जणांनी नोंदणी केली होती, त्यातील ३१८ दुचाकीस्वार सहभागी झाले होते तसेच १२९ सह प्रवासी हातात मतदान जनजागृतीचे बॅनर्स घेऊन त्यांचेसोबत सहभागी झाले होते.त्यामध्ये किंग्ज रॉयल रायडर्स मोटरसायकल क्लबच्या अनुप राजन, सुमित राठोड, सुभी बाबू,गौतम प्रसाद, साहिल पटेल,नितेश चिमूरकर, मोहन राऊत, अनंत पाटील, रोहन काकडे, नियोजीत,मधु सूदन, श्रेयश जाधव, आशिष जाधव, अक्षय पंडित, पुरुषोत्तम सिंह, एस.कृष्णा, प्रशांत सिंन्हा, शौर्य गुप्ता, अच्युत जगताप आणि योगेश कोळपकर यांचा तर डॉ.डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आकुर्डीचे प्रणव महाकालीवर, परितोष पटेल, पार्थ गायकवाड, वैभव पाटील, चैतन्य मुसळे, अथर्व पोकळे नाईट रायडर्स मोटरसायकल क्लबचे वैभव कुलकर्णी, समाधान कांबळे, सुरेंद्र सिंग जंगिरा, गुरुचरण ग्रेवाल,दिगंबर बगुले,मंगेश जाधव,कोमल बाल्यान, अमेय शिर्के,भूषण मगदूम, श्याम महाजन, पंकज मुनोली,साईप्रसाद काळे, सतीश कुमार तर सदर्न रायडर्स मोटरसायकल क्लबचे थाॅमस जोसेफ आणि त्यांचे सहकारी
यांचा समावेश होता.त्याप्रमाणे बी.यु.भंडारी एथर,राॅयल इन्फील्ड रिधान मोटर्स या शोमरूमचे रायडर्स देखील रॅलीत सहभागी होते.या बाईक रॅलीत महापालिकेचे अग्निशामक विभागातील सब ऑफिसर गौतम इंगवले, चंद्रशेखर घुले, विजय घुगे, तसेच त्यांचे सहकारी संजय महाडिक, अमोल रांजणे, लक्ष्मण बंडगर, दिनेश येलवे, संपत गौर, किशोर जाधव, प्रणव शुक्ल, ललित घोलप, अजय पवार, योगीनाथ आवटे, शुभम पिंगळे, सखाराम चिमटे, तेजस पवार, परमेश्वर दराडे, रमाकांत नवगिरे, अविष्कार पिसाळ, ऋषिकेश जगताप आणि सागर वाघमारे हेही सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी स्मार्ट सारथीचे जस्टिन मॅथ्यु, बिनीश सुरेंद्रन, आशिष चिकणे,किरण लवटे, प्रेम मुजमुले, संकेत जोशी,सत्यम नगादे, श्रेया निपाणे, जानव्ही वडोणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश शिंदे यांनी, सूत्रसंचालन व मतदान शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले,तर अण्णा बोदडे यांनी पोलीस प्रशासन,वाहतुक पोलीस, तसेच विविध विभागाच्या योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
29.1 ° C
29.1 °
29.1 °
84 %
1kmh
40 %
Thu
29 °
Fri
33 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!