33.5 C
New Delhi
Sunday, July 13, 2025
Homeताज्या बातम्यामोशीत लोखंडी होर्डिंग कोसळले!

मोशीत लोखंडी होर्डिंग कोसळले!

गाड्यांचे मोठे नुकसान, सुदैवाने जिवीतहानी नाही!

पिंपरी- दोन ते तीन दिवसाखाली मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना घडली असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा वारा आल्याने हे होर्डिंग थेट कोसळले.सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा जीविहितहानी झालेली नाही. मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे.

यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसल्याने वाहतुकीला कोणतीची अडचण निर्माण झाली नाही. घाटकोपरमधील घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ लोकांचा मृत्यू झाला होता.पिंपरी चिंचवडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. शिवाय, जोराचा वारा देखील वाहू लागला आहे. त्यातच सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असलेले होर्डिंग कोसळले. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर न पडता विरुद्ध बाजूला पडले. होर्डिंगच्या बाजूला उभ्या असलेल्या चार वाहनांवर हे होर्डिंग पडले. यात वाहनांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.5 ° C
33.5 °
33.5 °
63 %
1.9kmh
99 %
Sun
35 °
Mon
38 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!